AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल मिळत नसल्याने झोमॅटो बॉयने शोधला भन्नाट उपाय, VIDEO व्हायरल

ट्रकचालकांच्या संपामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला. या दरम्यान पेट्रोल स्टेशनवर मोठी गर्दी झाली होती. झोमॅटो बॉयला देखील यावेळी समस्यांचा सामना करावा लागला, पेट्रोल मिळत नसल्याने एका झोमॅटो बॉयने चक्क घोड्यावर फूड डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला. हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

पेट्रोल मिळत नसल्याने झोमॅटो बॉयने शोधला भन्नाट उपाय, VIDEO व्हायरल
zomato boy
| Updated on: Jan 03, 2024 | 9:01 PM
Share

Zomato boy viral video : हिट-अँड-रन अपघातांवरील नवीन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी संप पुकारला होता. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती. ही शक्यता इतकी झपाट्याने देशभरात पसरली की अनेक ठिकाणी इंधन भरण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या दरम्यान फूड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो बॉयला देखील फटका बसला. या दरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. कारण एका झोमॅटो बॉयने चांगलाच जुगाड केला होता. त्याने चक्क घोड्यावर फूड डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला होता.

न्यूज एजन्सी IANS नुसार, झोमॅटोची बॅग घातलेला डिलिव्हरी बॉय चंचलगुडा भागातील इम्पीरियल हॉटेलजवळच्या रस्त्यावर घोड्यावर स्वार होताना दिसला. घोड्यावर स्वार होऊन ऑर्डर दिल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

यूजर्स या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करत आहेत. एका युजरने म्हटले की, “मोटारसायकलचे पेट्रोल संपल्यानंतर त्याच्या मनात ही अनोखी कल्पना आली असावी.”

2002 मध्ये मुसळधार पावसात मुंबईत अन्न वितरीत करण्यासाठी घोड्यावर स्वार झालेल्या स्विगी कर्मचाऱ्याच्या दृश्याची आठवण या व्हिडिओने करून दिली.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.