AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बस विसरा! आता विमानातूनच कमी भाड्यात प्रवास करा, LAT एयरोस्पेस छोट्या शहरात देणार सेवा

LAT एअरोस्पेसने आपल्या टीमचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे.एअरोस्पेस कंपनी अभियंते, सिस्टम डिझायनर्स आणि विमान चालनातील उत्साही लोकांना नियुक्त करीत आहे.

बस विसरा! आता विमानातूनच कमी भाड्यात प्रवास करा, LAT एयरोस्पेस छोट्या शहरात देणार सेवा
| Updated on: Jul 03, 2025 | 9:40 PM
Share

येत्या काही दिवसात विमान प्रवास इतका सोपा होणार आहे की जणू बसप्रवासच..हवाई सेवा आता केवळ मोठ्या शहरांची मक्तेदारी राहणार नाही. तर प्रत्येकासाठी त्याच्या शहरात उपलब्ध होणार आहे. एव्हीएशन स्टार्टअप LAT एयरोस्पेस कंपनीची अशी काही भारतात करण्याची इच्छा आहे. या कंपनीत झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी गुंतवणूक केलेली आहे.

LAT एयरोस्पेसच्या को-फाऊंडर सुरभी दास यांनी झोमॅटोचे सीईओ दीपिंदर यांच्या गुंतवणूकी संदर्भातील बातमी लिंक्डईन पोस्टवर दिलेली आहे. सुरभी दास झोमॅटोत चीफ ऑपरेटींग ऑफीसर म्हणून तिने काम केले आहे.बातम्यानुसार LAT एअरोस्पेसने ५० दशलक्ष डॉलर म्हणजेच ४१७ कोटींचा फंड जमा केला आहे. त्यातील २० दशलक्ष डॉलर म्हणजे १६७ कोटी रुपये स्वत: झोमॅटोचे सीईओ दीपिंदर यांनी दिले आहेत.

छोट्या शहरांना विमानाने जोडणार

या स्टार्टअपचा हेतू विमान प्रवास सोपा आणि स्वस्त करण्याचा आहे. हा एव्हीएशन स्टार्टअप छोटी शहर आणि विभागांना (टिअर 2 आणि टिअर 3 शहरं ) विमान सेवेने जोडणार आहे. सुरभी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहीलंय की, जेव्हा आम्ही झोमॅटोसाठी भारत विमानाने फिरायचो तेव्हा आम्हाला प्रश्न पडायचा की भारतात प्रादेशिक विमान प्रवास एवढा कठीण, महाग आणि कमी का आहे?’

12 ते 24 आसनांची छोटी विमाने बनवणार

कंपनीने आता 12 ते 24 आसनांची छोटे शॉर्ट टेकऑफ अँड लँडींग (STOL) एअरक्राफ्ट बनविण्याचा निर्णय घेतला आहे. जे छोट्या-छोट्या एअर थांब्यांवरुन सेवा पुरवणार आहेत. जे लोकांच्या घराजवळ असतील आणि ना बॅगेज बेल्ट,ना सिक्युरिटी चेकींगची लांब लाईन असे काही नसणार. लोक बसला बसतात तसेच चालत येतील आणि उड्डाण घेतील. हा प्रवास 1500 Km पर्यंतचा असेल. जो भारताची भौगोलिक आणि लोकसंख्या पाहून तयार केलेला असेल.

450 हून अधिक धावपट्ट्या,पण केवळ 150 चा वापर

भारतात सध्या ४५० हून अधिक धावपट्ट्या आहेत. परंतू त्यातील केवळ १५० वरच कमर्शियल उड्डाणे होत आहेत. म्हणजे देशाच्या दोन तृतीयांश एव्हीएशन क्षमतेचा वापरच केला जात नाहीए. दुसरीकडे टीअर २ आणि टीअर ३ च्या शहरात राहणारे लाखो लोक रस्ता वा ट्रेनने तासन् तास , तर कधीकधी दिवसभर प्रवासात वेळ खर्च करत आहेत. कारण त्यांच्यासाठी स्वस्त आणि काही मिनिटांनी असणारी हवाई सेवा उपलब्ध नाही. LAT एअरोस्पेसचे मिशन या शहरांना जोडण्याचे आहे. कंपनी तिची टीम वाढवण्याची तयारी करीत आहे.

राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का.
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद.
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल.
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?.
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.