या आहेत भारताच्या सर्वात सुरक्षित इलेक्ट्रीक कार, सर्वांना आहे 5 – स्टार रेटींग
जर तुम्हाला इलेक्ट्रीक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची प्राथमिकता सेफ्टी रेटींग काय आहे याकडे असणार आहे. त्यामुळे या 5 मॉडेल्सचा चांगला पर्याय आहे. या इलेक्ट्रीक कार केवळ लेटेस्ट टेक्नॉलॉजीने परिपूर्ण नसून त्या फॅमिली आणि पर्सनल सेफ्टीसाठी देखील टॉपवर आहे. चला तर पाहूयात या कारना सेफ्टीत किती अंक मिळाले आहेत.

गेल्या काही वर्षात वाढत्या इंधनदरांमुळे ग्राहक इलेक्ट्रीक कारना प्राधान्य देत आहेत. पूर्वी कारची मायलेज आणि किंमतीवर प्राधान्य असायचे आता मात्र कारची सेफ्टीला सर्वाधिक महत्व दिले जात आहे. याचा थेट परिणाम कंपन्यांच्या निर्मितीवर पडला आहे. आता बहुतांश वाहन निर्माता कंपन्या आपल्या नव्या कार मॉडेल्समध्ये सेफ्टीला सर्वाधिक प्राधान्य देत आहेत. खास करुन इलेक्ट्रीक वाहनांच्या बाबतीत..
तुम्ही जर एक सुरक्षित आणि विश्वासार्ह इलेक्ट्रीक कार घेऊ इच्छीता तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.अलिकडे भारतात NCAP ( Bharat NCAP ) द्वारा केलेल्या क्रॅश टेस्ट्समध्ये देशातील 5 इलेक्ट्रीक कारना फॅमिली सेफ्टी कारम्हणून 5- स्टार रेटींग दिलेली आहे. अलिकडे काही मॉडेल्स लाँच झाले आहेत. तर काही आधीच प्रसिद्ध झाले आहेत.
Tata Harrier EV
नुकत्याच लाँच झालेल्या हॅरिअर EV ने सेफ्टीच्या प्रकरणात सर्वांनाच आश्चर्यचकीत केले आहे. या कारला एडल्ट सेफ्टीत 32 पैकी 32 गुण मिळाले आहेत. तर चाईल्ड सेफ्टीसाठी या कारला 49 पैकी 45 क्रमांक मिळाला आहे. टाटा हॅरिअर ईव्ही कारची सुरुवातीची किंमत 21.49 लाख रुपये आहे. ही एक 5 आसनी सुव्ह कार आहे.
Mahindra XEV 9e
महिंद्राच्या या खास इलेक्ट्रीक SUV ने शानदार प्रदर्शन केले आहे. या कारला देखील एडल्ट सेफ्टीत 32 पैकी 32 गुण मिळाले आहेत. आणि चाईल्ड सेफ्टीत 45 गुण मिळाले आहेत. त्यामुळे ही सर्वात सेफ इलेक्ट्रीक कारच्या यादीत सामील झाले आहे. महिंद्रा XEV 9e एक 5-आसनी कुपे SUV आहे. हीची किंमत 21.90 लाख रुपयांपासून सुरु होते. हीच्या टॉप मॉडेलची किंमत 31.25 लाख रुपयांपर्यंत जाते.
Mahindra BE 6
महिंद्रा BE सीरीज ही कार देखील सेफ्टीत मागे नाही.या कारला एडल्ट प्रोटेक्शनसाठी 31.97 गुण आणि चाईल्ड सेफ्टीत 45 गुण मिळाले आहेत. महिंद्रा BE 6 एक 5-सीटर इलेक्ट्रीक कूपे आणि कन्व्हर्टिबल सुव्ह आहे. हीची सुरुवातीची एक्स – शोरुम किंमत 18.90 लाख रुपये आहे.
Tata Punch EV
कॉम्पॅक्ट EV सेगमेंटमध्ये टाटा पंच EV ने दमदार एण्ट्री केली आहे. या कारने एडल्ट सेफ्टीमध्ये 31.46 गुण आणि चाईल्ड सेफ्टीत 45 गुण मिळाले आहेत. टाटा पंच ईव्हीची किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरु होते. आणि टॉप मॉडेल्सची किंमत 14.44 लाख रुपये आहे.
Tata Curve EV
टाटाची कूपे-स्टाईल SUV कर्व्ह EV ला एडल्ट सेफ्टीसाठी 30.81 गुण आणि चाईल्ड सेफ्टीत 44.83 गुण मिळाले आहेत. टाटा कर्व्ह ईव्ही एक 5-आसनी कूपे एसयूव्ही आहे. या कारची किंमत 17.49 लाख रुपयांपासून सुरु होते. आणि टॉप मॉडलसाठी 22.24 लाख रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागू शकतात.
