AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zomato आता ही गोष्ट ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार, कंपनीने सुरु केली नवीन सेवा

Zomato service : झोमॅटो कंपनीने आता नवीन सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांना याचा फायदा होणार आहे. झोमॅटोची ही सेवा व्यापाऱ्यांपासून सर्वसामान्य नागरिकाला ही घेता येणार आहे. यासाठी एक नवीन App देखील लॉन्च केले जाणार आहे.

Zomato आता ही गोष्ट ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार, कंपनीने सुरु केली नवीन सेवा
| Updated on: Oct 14, 2023 | 6:38 PM
Share

Zomato new service : तुमच्यापर्यंत जेवण पोहोचणारे झोमॅटोने आता नवीन सेवा सुरु केली आहे. झोमॅटो आता पार्सल सेवा देखील देणार आहे. यासाठी कंपनीने एक्स्ट्रीम ही हायपरलोकल डिलिव्हरी सेवा सुरू केली आहे. ज्यामध्ये 3 लाखांहून अधिक वितरण भागीदार संबंधित आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, Zomato खाद्यपदार्थ डिलिव्हरी करणाऱ्या सर्व 750-800 शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यासाठी एक वेगळा अॅपवर उपलब्ध होणार आहे.

झोमॅटोकडून एक्‍स्ट्रीम सेवा

शॅडोफॅक्स, पोर्टर आणि लोडशेअरच्‍या धर्तीवर शहरात छोटे पॅकेज वितरीत करण्‍यासाठी झोमॅटोने एक्‍स्ट्रीम सेवा सुरू केली आहे. यामुळे लहान आणि मोठ्या व्यापाऱ्यांना त्यांचे पार्सल पाठवण्यास आणि प्राप्त करण्यास मदत होणार आहे. व्यापाऱ्यांव्यतिरिक्त, इतर लोकांना देखील पार्सल पाठवता येणार आहे.

Xtreme App नवीन खेळाडू

Xtreme App वर उपलब्ध माहितीनुसार, युजर कागदपत्रे, औषधे, फूड, किराणा, कपडे, सौंदर्यप्रसाधने आणि इतर वस्तूंचे 10 किलो वजनाचे छोटे पार्सल पाठवू शकतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी डिलिव्हरीच्या पहिल्या किलोमीटरसाठी 25 रुपये आकारत आहे, दर अतिरिक्त किलोमीटरसोबत दर वाढणार आहेत. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही.

हायपरलोकल डिलिव्हरीमध्ये झोमॅटोचा प्रवेश अशा वेळी होत आहे जेव्हा रिलायन्स रिटेलची डन्झो इकोसिस्टममध्ये गंभीर तणावाखाली आहे. सॉफ्टबँक-समर्थित ओलाने डन्झो चालविण्यास असमर्थतेमुळे हायपरलोकल डिलिव्हरी विभागात प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीत झोमॅटोचे या दिशेने पडलेले पाऊल महत्त्वाचे ठरू शकते.

2 कोटी रुपयांचा निव्वळ नफा

झोमॅटोने जून 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत 2 कोटी रुपयांचा पहिला निव्वळ नफा कमवला होता, तर एका वर्षापूर्वी 186 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. लॉयल्टी प्रोग्राममुळे हा नफा कंपनीला आला आहे. तिमाहीत त्याचा महसूल वार्षिक तुलनेत जवळपास 71% वाढून 2,416 कोटी रुपये झाला आहे.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.