AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… म्हणूनच भारताच्या शेवटच्या गव्हर्नरलाही बाबासाहेबांची साथ वाटली होती आल्हाददायक, वाचा पडद्या मागची गोष्ट…

'आंबेडकर इंटरनॅशनल मिशन' या स्मरणिकेसाठी जेव्हा भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंटबॅटन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काही आठवणी सांगितल्या. डॉ. आंबेडकर जेव्हा देशाचे पहिले मजूर झाले तेव्हा त्यांनी कामगार, महिला आणि भारताच्या सामाजिक एकतेसाठी प्रचंड मोठे काम केले आहे आणि ते अवर्णनीय आहे असंही ते म्हणतात.म्हणून त्यांनी लिहिलं आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर काम करतानाचा अनुभव हा नेहमीच मला आल्हाद देणारा होता.

... म्हणूनच भारताच्या शेवटच्या गव्हर्नरलाही बाबासाहेबांची साथ वाटली होती आल्हाददायक, वाचा पडद्या मागची गोष्ट...
भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंटबॅटन यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी प्रचंड आस्था होतीImage Credit source: TV9
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Apr 14, 2022 | 7:13 AM
Share

मुंबईः लंडनमध्ये जेव्हा ‘आंबेडकर इंटरनॅशनल मिशन’ (Ambedkar International Mission) व ‘डॉ.आंबेडकर जन्मशताब्दी समिती’ या संस्थांच्या स्मरणिकासाठी जेव्हा भारताचे शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन (British Viceroy Lord Mountbatten) यांनी 26 मार्च 1968 व 14 एप्रिल 1973 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आठवणी लिहून दिल्या त्या आठवणीत ते बाबासाहेबांबद्दल लिहितात की, माझी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr, Babasaheb Ambedkar) यांची पहिली भेट झाली ती आजही माझ्या मनात तशीच स्मरते. ते म्हणतात की, दक्षिण-पूर्व आशियाचा सुप्रिम अलाईड कमांडर म्हणून 1943 रोजी माझी नेमणूक झाली तेव्हा माझ्या कामाचे ठिकाण होते ते दिल्ली.

त्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची व्हाईसरॉयच्या कौन्सिलचे ते मजूर सदस्य म्हणून त्यांची त्यांची नेमणूक झाली होती. त्या काळातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य आणि समभाव यासाठीच लढत होते. समकालीन सहकार्‍यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचे संपादन आणि लेखन करणारे विजय सुरवाडे यांच्या ग्रंथात बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी सांगण्यात आल्या आहे.

नाझी आणि फॅसिस्ट नको

युद्ध काळावर बोलताना ते म्हणायचे नाझी आणि फॅसिस्ट यांनी जर युद्ध जिंकले तर समता, स्वातंत्र्य आणि समभावयुक्त समाज कधीच निर्मित होणार नाही. त्याकाळात काळाचा किती तरी भविष्याचा विचार करुन आणि भविष्य जाणून होते म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय कामगार या दोघांनीही दुसरे महायुद्ध सुरु ठेवण्यासाठी सक्रिय सहकार्य करत राहिले.

माझ्यासाठी आंबेडकर मोठा आधार

ब्रह्मदेशात ज्यावेळी युद्ध सुरु झाले त्यावेळी भारतीय सैनिकांकरवी युद्धात ब्रह्मदेशात सक्रिय झाला, त्या युद्धामुळेच डॉ. आंबेडकर यांच्या पाठिंबा मागण्यासाठी मी त्यांची भेट घेतली होती. ज्यावेळी त्यांनी माझ्या सहकार्यासाठी माझ्या पाठिमागे उभा राहिले तेव्हा त्यांचा त्या काळातील मला खूप मोठा आधार होता असं त्या आपल्या आठवणीत सांगतात.

बाबासाहेबांच्या प्रस्तावाला ब्रिटिश गर्व्हनरांचे जोरदार समर्थन

स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात बाबासाहेब आंबेडकर यांची जेव्हा नेमणूक करण्यात आली, तेव्हा 1947 मध्ये लॉर्ड माऊंटबॅटन हे भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते, त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांना स्वंतत्र भारताच्या पहिल्या मंत्री मंडळात त्यांची विधी मंत्री म्हणून नेमणूक व्हावी तेव्हा माझे आणि जवाहरलाल नेहरू यांच्या प्रस्तावाला जनरल लॉर्ड माउंट माऊंट बॅटन यांनी प्रस्तावाला जोरदार पुष्टी दिली होती असं ते समकालीन घटनेविषयी नमूद करतात.

संविधानाची कार्यक्षमरित्या निर्मिती

माउंट बॅटन आपल्या त्या आठवणीत सांगतात की, भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या नेमणुकीला सहमती देताना त्यांना पाहून मला केवढा तरी आनंद झाला होता. माझा आनंद तो वैयक्तिक नव्हता, तर भारतीय संविधान समितीमध्ये भारताच्या नव्या संविधानाची त्यांनी अत्यंत कार्यक्षमरित्या निर्मिती करत असताना त्यांना कौतुकानेच पाहिले असल्याचे पुस्तकात सांगितले आहे.

सगळ्यांचेच बाबासाहेब

भारतातील अठरा पगड जातींसाठी अस्पृश्य, अनुसुचित समाजातील दुःख, दैन्य वाहून नेण्याचे काम कुणी केले असेल तर डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी. ब्रिटिश सत्येचे ज्यावेळी हस्तांतरण झाले त्यावेळी अस्पृश्य समाजातील 60 लाख माणसं ही दलित होती, म्हणजेट ब्रिटिश बेटाच्या लोकसंख्येपेक्षाही कितीतरी पटीने अधिक होती. या एवढ्या लाखो समुहाच्या नेत्याला अस्पृश्य जनता बाबासाहेब म्हणत हे ही त्यांनी आपल्या आठवणीत सांगितले आहे.

असंख्य विरोधकांविरुद्ध एकटे उभा

बाबासाहेबांविषयी लिहिताना लॉर्ड माउंट बॅटन म्हणतात,दलित असणं, अस्पृश्यतेचे चटके सहन करणे ही सगळी दुःखं बाबासाहेब यांनी भोगली होती. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर भारतातील त्यांच्या असंख्य विरोधकांविरुद्ध एकटे उभा राहिले आणि एकटे स्वतःच्या जीवावर लोकशाही मार्गाने रक्तरंजित क्रांति न करता लढत राहिले.

पुणे करारात आक्रमक भूमिका

भारताच्या इतिहासातील अजरामर झालेल्या पुणे कराराविषयी लॉर्ड माउंट बॅटन लिहितात,महात्मा गांधींच्या पुणे करारात दिल्या गेलेल्या अस्पृश्यांच्या विधिमंडळातील प्रतिनिधीत्वासंबंधीच्या उपाय योजनेविरुद्ध त्यांनी अगदी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली होती.

धैर्यवान बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे असे मत होते की, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे केले गेले तर अस्पृश्यांना काँग्रेस पक्षाच्या दावणीस बांधले जाणार आहे. त्या करारावरुन साऱ्या जगाला कळले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड मोठे धैर्य होते. म्हणून भारतासारख्या देशात, त्या वातावरणात त्यांचेसारखे ठामपणे उभा राहणे म्हणजे प्रचंड मोठ्या धैर्याची गरज होती ती. म्हणूनच ज्याचा भारताच्या इतिहासात अजरामर ठसा उमटलेला आहे अशा स्वच्छ दृष्टीच्या या लढवय्याला जाणून घेणे म्हणजे एक आल्हाददायक अनुभव होता असेच ते म्हणतात.

(या लेखासाठी विजय सुरवाडे यांनी संपादन केलेल्या समकालीन सहकार्‍यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर  या ग्रंथाचा आधार घेतला आहे.)

संबंधित बातम्या

ज्योतिबा फुलेः 19 व्या शतकात रुढी परंपराविरुद्ध आवाज उठविणारा पहिला महात्मा

सलग 50 वर्षे संसद गाजवून विक्रम नोंदविणारा नेता म्हणजे ‘जगजीवन राम’;पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार असूनही अन्याय…

Political Crisis in Pakistan : तर भारतात चालते व्हा, नवाज शरीफच्या मुलीनं इम्रान खानला सुनावलं, इम्रान म्हणतात, भारतीय खुद्दार ‘कौम’ !

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?