भारतातील पहिला अश्लील चित्रपट, ज्यामध्ये मधुबालाने दिलेले प्रचंड बोल्ड सीन, स्वत:पण बघू शकली नाही

76 वर्षांपूर्वीचा सर्वात एडल्ट चित्रपट, ज्यामध्ये मधुबालाने दिले होते असे सीन की, अभिनेत्री देखील थिएटरमध्ये पाहू शकली नाही. मिळालेले A सर्टिफिकेट.

| Updated on: May 18, 2026 | 5:36 PM
1 / 5
सध्या चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये बोल्ड कंटेंट, इंटिमेट सीन किंवा प्रौढ विषय दाखवणे सामान्य झाले आहे. मात्र 1950 च्या दशकात परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. त्या काळात एखाद्या चित्रपटात थोडेसे धाडसी सीन किंवा तीव्र संवाद दाखवले तरी प्रेक्षक आणि सेन्सॉर बोर्ड हादरून जायचे.

2 / 5
अशाच एका चित्रपटाने तब्बल 76 वर्षांपूर्वी भारतीय सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडवली होती. विशेष म्हणजे हा चित्रपट त्याच्या कथेमुळे नाही तर त्याला मिळालेल्या सर्टिफिकेटमुळे अधिक चर्चेत आला होता. हा चित्रपट म्हणजे 'हँसते आँसू'. भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच या चित्रपटाला ‘A’ म्हणजेच ‘Adults Only’ सर्टिफिकेट देण्यात आले होते.

3 / 5
या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिग्गज अभिनेत्री मधुबाला झळकल्या होत्या. त्या वेळी त्यांचे वय अवघे 16 वर्षे होते. आपल्या सौंदर्याने, निरागसतेने आणि मोहक अभिनयाने मधुबालाने त्या काळात प्रेक्षकांची मने जिंकली होती.

4 / 5
या चित्रपटात त्यांनी काही असे प्रसंग साकारले होते, जे त्या काळाच्या मानाने खूपच धाडसी मानले गेले. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला थेट ‘A’ सर्टिफिकेट दिले. विशेष म्हणजे ज्या चित्रपटामुळे भारतीय सिनेमात ‘A’ सर्टिफिकेटची सुरुवात झाली, तो चित्रपट मधुबालाला स्वतः थिएटरमध्ये जाऊन पाहताही आला नव्हता.

5 / 5
या चित्रपटाची कथा कौटुंबिक नातेसंबंध, घरातील भांडणे आणि पती-पत्नीमधील तणाव याभोवती फिरत होती. त्या काळात चित्रपटांमध्ये घरगुती हिंसा किंवा वैवाहिक वाद फारसे दाखवले जात नव्हते. मात्र या चित्रपटामध्ये असे काही प्रसंग होते, ज्यामुळे सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला.

Follow Us