80 च्या दशकातील सुपरहिट कॉमेडी मालिका, लोक हसून-हसून व्हायचे बेजार, आजही Youtube वर लोक बघतात मालिका
67 भागांचा असा एक सुपरहिट कॉमेडी मालिका, टीव्हीवर सुरु होताच 80 च्या दशकात लोक पोट धरून हसायचे. या मालिकेमुळे चित्रपटांच्या कमाईवर झाला होता मोठा परिणाम. आजही Youtube वर लोक बघतात ही मालिका.

भारतीय दूरदर्शनच्या इतिहासात 80 ते 90 च्या दशकात अनेक लोकप्रिय मालिका आल्या. मात्र, एका मालिकेने असा विक्रम केला की आजही कोणतीही मालिका तो मोडू शकलेली नाही. ही मालिका म्हणजे 1984 मध्ये प्रसारित झालेली 'ये जो है जिंदगी'.

या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर इतकी जबरदस्त छाप पाडली होती की तिच्या लोकप्रियतेमुळे बॉलिवूड चित्रपटांच्या कमाईवरही परिणाम झाला होता. त्या काळात टीव्ही प्रत्येक घरात पोहोचलेला नव्हता. दूरदर्शन हेच एकमेव मोठे मनोरंजनाचे माध्यम होते.

अशा परिस्थितीत ‘ये जो है जिंदगी’ ही मालिका सुरू झाली. सुरुवातीला निर्मात्यांना या मालिकेकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. फक्त 13 भागांची मालिका बनवण्याचा विचार होता. मात्र, मालिकेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे पुढे तिचे अनेक भाग तयार करण्यात आले.

ही मालिका इतकी सुपरहिट झाली होती की तिच्या प्रसारणाच्या वेळी लोक चित्रपटगृहांकडे पाठ फिरवत होते. विशेष म्हणजे ही मालिका दर शुक्रवारी रात्री प्रसारित होत असे. त्या काळात बॉलिवूड चित्रपटांसाठी शुक्रवारचा इव्हनिंग शो अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता.

अनेक चित्रपटांची कमाई मुख्यतः संध्याकाळच्या शोवर अवलंबून असायची. पण ‘ये जो है जिंदगी’ पाहण्यासाठी लोक चित्रपट सोडून घरी टीव्हीसमोर बसत होते. त्यामुळे चित्रपट निर्मातेही चिंतेत पडले होते.

आजही अनेक प्रेक्षक ही मालिका YouTube वर पाहतात आणि जुन्या आठवणींना उजाळा देतात. भारतीय टेलिव्हिजन इतिहासातील सर्वात संस्मरणीय आणि यशस्वी मालिकांमध्ये ‘ये जो है जिंदगी’चे नाव आजही अभिमानाने घेतले जाते.