रणवीर सिंहचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, ज्यामधील फक्त 1 गाणं ठरलं प्रचंड सुपरहिट, आजही ऐकताच…

1812 कोटींचा चित्रपट देणाऱ्या रणवीर सिंहने दिलाय सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, ज्यामध्ये होती 6 गाणी. मात्र, एका गाणं ठरलं प्रचंड सुपरहिट. आजही प्रत्येकजण ऐकतो.

| Updated on: Jul 06, 2026 | 3:15 PM
1 / 5
दरवर्षी मोठ्या बजेटचे आणि स्टारकास्टने सजलेले अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. निर्माते कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करतात. दमदार कलाकारांची फळी उभी करतात आणि चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही मोठा खर्च करतात. मात्र, एवढ्या प्रयत्नांनंतरही काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकत नाहीत.

2 / 5
तरीही अशा अनेक चित्रपटांतील गाणी मात्र प्रचंड लोकप्रिय ठरतात आणि वर्षानुवर्षे रसिकांच्या मनात कायम राहतात. रणवीर सिंहचा 'लुटेरा' हा चित्रपट त्याचं उत्तम उदाहरण मानला जातो.

3 / 5
चित्रपटाच्या ट्रेलर आणि संगीताला प्रदर्शना आधीच चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र, थिएटरमध्ये हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे कमाई करू शकला नाही. चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नसला तरी त्यातील संगीत आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

4 / 5
संगीतकार अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केलेल्या या चित्रपटात एकूण सहा गाणी आहेत. . यापैकी विशेषतः 'सवार लूं' हे गाणे प्रचंड गाजले. मोनाली ठाकूर यांच्या सुरेल आवाजाने आणि अमित त्रिवेदी यांच्या मधुर संगीताने हे गाणे आजही चाहत्यांच्या आवडीच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहे.

5 / 5
सोशल मीडियावर या गाण्यावर आजही मोठ्या प्रमाणात रील्स तयार केल्या जात असून त्याला लाखो-कोट्यवधी व्ह्यूज मिळत आहेत. आज 'लुटेरा' हा चित्रपट JioHotstar वर उपलब्ध असून, प्रदर्शित होऊन अनेक वर्षे उलटल्यानंतरही त्याची लोकप्रियता कायम आहे.

Follow Us