2023 KTM 250 Adventure बाइकची प्रतिक्षा संपली, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

| Updated on: Apr 22, 2023 | 6:52 PM

2023 KTM 250 Adventure बाइक ओबीडी2 सपोर्टसह लाँच केली आहे. ही बाइक सिंगल व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. चला जाणून घेऊयात इतर फीचर्स आणि किंमत

1 / 5
गेल्या काही दिवसांपासून अॅडव्हेंचर बाइकबाबत असलेली प्रतिक्षा संपली आहे. केटीएमने बाइकप्रेमींसाठी 2023 केटीएल 250 अॅडव्हेंचर बाइक लाँच केली आह. अपडेटेड इंजिनसह या गाडीची एक्स शोरुम किंमत 2,46,651 रुपये आहे. या बाइकमध्ये ओबीडी2चा सपोर्ट आहे. (Photo: KTM)

2 / 5
ही बाइक नव्या एमिशन नियमांसह सादर केली आहे. या बाइकमध्ये 248.76 सीसी सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल, DOHC इंजिन पॉवर आहे. ट्रान्समिशनसाठी 6 स्पीड गियरबॉक्स आहेत. (Photo: KTM)

3 / 5
लाँग ड्राईव्हसाठई ही बाइक जबरदस्त आहे. केटीएमच्या अॅडव्हेंचर बाइकच्या विंडशील्डच्या पोझिशनला बदलता येऊ शकते. या गाडीची 14.5 लिटरची टाकी फूल केली तर 400 किमी पर्यंत धावू शकते. (Photo: KTM)

4 / 5
KTM 250 Adventure च्या नवीन मॉडेलची वैशिष्ट्ये पूर्वीसारखीच आहेत. यात एलईडी डीआरएलसह हॅलोजन हेडलाइट, एलईडी टेललाइट आणि एलईडी टर्न इंडिकेटर यांसारखी वैशिष्ट्ये मिळतील. तसेच पूर्ण-डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे. (Photo: KTM)

5 / 5
ऑफ-रोड अनुभवासाठी ड्युअल-चॅनल एबीएस सिस्टम देखील देण्यात आली आहे. रायडरला स्लिपर क्लच आणि 12V सॉकेटसह भरपूर सपोर्ट मिळेल. भारतातील अॅडव्हेंचर बाइक्स सुझुकी व्ही-स्ट्रॉम एसएक्स आणि रॉयल एनफिल्ड हिमालयन सारख्या बाइक्सशी स्पर्धा असेल. (Photo: KTM)