200 दिवसांपासून OTT वर राज्य करतोय हा चित्रपट, साधी कथा करतेय प्रेक्षकांना आकर्षित

गाव, नाती आणि संघर्षाची भावनिक कहाणी, 2 तास 28 मिनिटांचा हा चित्रपट OTT वर करतोय राज्य, पूर्ण केले 200 दिवस, अजूनही चाहते हा चित्रपट बघत आहे.

| Updated on: May 21, 2026 | 2:20 PM
1 / 5
गेल्या काही वर्षांत भारतीय चित्रपटसृष्टीत अशा अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे, जे थेट सामान्य माणसांच्या आयुष्याशी जोडलेले आहेत. मोठे अ‍ॅक्शन सीन्स, भव्य सेट्स किंवा ग्लॅमरपेक्षा अशा चित्रपटांमध्ये नाती, कुटुंब, भावना आणि संघर्ष यांना अधिक महत्त्व दिलं जातं. त्यामुळेच प्रेक्षकही या कथांशी पटकन जोडले जातात.

2 / 5
गावाकडचं साधं आयुष्य, कुटुंबातील नातेसंबंध आणि बदलत्या काळात येणाऱ्या अडचणी जेव्हा पडद्यावर वास्तववादी पद्धतीने दाखवल्या जातात, तेव्हा त्या कथा लोकांना स्वतःच्या आयुष्याशी संबंधित वाटतात. अशाच एका भावनिक आणि साध्या कथानकाच्या चित्रपटाने गेल्या वर्षी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या चित्रपटाचं नाव आहे ‘इडली कडई’.

3 / 5
‘इडली कडई’ची कथा मुरुगन नावाच्या एका साध्या तरुणाभोवती फिरते. मोठं काहीतरी करण्याचं स्वप्न पाहत तो आपलं गाव सोडून परदेशात जातो. गावात राहून आयुष्यात काही मोठं साध्य होणार नाही असं त्याला वाटत असतं. मात्र, अचानक त्याच्या आयुष्यात मोठा धक्का बसतो. वडिलांच्या निधनानंतर त्याला पुन्हा गावात परतावं लागतं. गावात आल्यानंतर त्याला कुटुंबाचं महत्त्व आणि जबाबदारीची खरी जाणीव होते.

4 / 5
यानंतर तो आपल्या वडिलांचा छोटासा इडली व्यवसाय पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न करतो. संघर्ष, कुटुंब आणि नात्यांची भावनिक गुंफण या चित्रपटात अतिशय साध्या पण प्रभावी पद्धतीने दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाची सर्वात मोठी खासियत म्हणजे धनुषने या चित्रपटात तिहेरी जबाबदारी सांभाळली. त्याने चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका अशी तिन्ही कामं केली आहेत.

5 / 5
चित्रपटाची कथा अतिशय साधी असली तरी तिचा भावनिक प्रभाव खोलवर जाणवतो. म्हणूनच थिएटरमध्ये मिश्र प्रतिसाद मिळाल्यानंतरही OTT वर या चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. विशेष म्हणजे OTT वर या चित्रपटाने 200 दिवस पूर्ण केले असून आजही प्रेक्षक ही भावनिक कथा आवडीने पाहत आहेत.

Follow Us