AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jason Holder: दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी कर्णधाराचा वनडे क्रिकेटला रामराम, प्रशिक्षकाने दिली माहिती

वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार जेसन होल्डरने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या बाबतची माहिती वेस्ट इंडिजचे हेड कोच डॅरेन सॅमी यांनी दिली आहे. होल्डरचं वनडे क्रिकेट कारकीर्द ही 10 वर्षांची राहिली आहे.

Jason Holder: दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी कर्णधाराचा वनडे क्रिकेटला रामराम, प्रशिक्षकाने दिली माहिती
Jason Holder: दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी कर्णधाराचा वनडे क्रिकेटला रामराम, प्रशिक्षकाने दिली माहितीImage Credit source: PTI
| Updated on: Jul 11, 2026 | 3:37 PM
Share

वेस्ट इंडिज संघाचा माजी कर्णधार जेसन होल्डरने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याच्या बातमीवर मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. सॅमीने विजडन क्रिकेटच्या पॉडकास्टवर याबाबतची माहिती दिली. सॅमीने सांगितलं की, होल्डरने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण कसोटी क्रिकेट खेळणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. वनडे क्रिकेटमधून जेसन होल्डरने निवृत्ती घेतल्याचं हे अधिकृत विधान आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उटलसूलट चर्चांना पूर्णविराम लागला आहे. दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार जेसन होल्डरने याबाबत स्वत: काही सांगितलं नाही. पण डॅरेन सॅमी यांना जेव्हा वेस्ट इंडिजच्या पुढच्या प्लानबाबत विचारलं गेलं आणि त्यात होल्डर बसतो का? तेव्हा सॅमी यांनी त्याच्याबाबतची माहिती दिली.

काय म्हणाला डॅरेन सॅमी?

डॅरेन सॅमी यांनी सांगितलं की, जेसन होल्डर अद्यापही कसोटी संघाचा भाग आहे. त्याने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण कसोटी खेळण्यास त्याची अजूनही पसंती आहे. होल्डर फ्रेंचायझी क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे त्याच्या खेळण्यााबबत एक मोठा प्रश्न आहे. डॅरेन सॅमीने त्याच्या निवृत्तीबाबत सांगताच क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. पुढच्या वर्षी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा होणार आहे. त्या आधीच त्याने निवृत्ती जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जेसन होल्डरने 2013 ते 2023 या कालावधीत दहा वर्षे त्याने आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेट खेळलं.

जेसन होल्डरने 86 सामन्यात वेस्ट इंडिजचं कर्णधारपद भूषवलं आहे. जेसन होल्डरने 138 वनडे आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने 24.85 च्या सरासरीने 2237 धावा केल्या आहेत. यात त्याची 99 धावांची खेळी सर्वोत्तम ठरली आहे. खालच्या फळीत फलंदाजी करणाऱ्या जेसन होल्डरला एकही शतक ठोकता आलं नाही. पण 11 अर्धशतकं ठोकली आहेत. तर अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या जेसनने 36.96 च्या सरासरीने 159 विकेट घेतल्या आहे. यात दोन वेळा पाचहून अधिक विकेट घेण्याचा मान मिळवला आहे. इतकंच काय तर वनडे कारकि‍र्दीत 65 विकेट घेतल्या आहेत.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला