रेड लाइट परिसरात सुचलेलं गाणं, 15 मिनिटांमध्ये झालं तयार, इतकं रोमँटिक की 36 वर्षानंतरही प्रचंड आवडतं

5 मिनिट 32 सेकंदाचं प्रचंड रोमँटिक गाणं, जे रेड लाईट परिसरात सुचलेलं, 15 मिनिटांमध्ये तयार झालेलं गाणं. आजही तरुण या गाण्याचे प्रचंड वेडे. ऐकताच जुन्या आठवणींमध्ये रमतात लोक.

| Updated on: May 15, 2026 | 4:36 PM
1 / 5
90 च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टी म्हटलं की अनेक सुपरहिट गाणी आणि भावनिक प्रेमकथा आजही चाहत्यांच्या मनात ताज्या होतात. त्या काळातील अनेक चित्रपटांचे संगीत आजही लोकांच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहे. अशाच सदाबहार चित्रपटांपैकी एक म्हणजे 'आशिकी'.

2 / 5
या चित्रपटातील प्रत्येक गाणे प्रचंड गाजले होते आणि आजही ती गाणी ऐकली की जुन्या आठवणी ताज्या होतात. या चित्रपटातून राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर आली होती. 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले होते.

3 / 5
मात्र चित्रपटाइतकीच त्यातील गाणीही सुपरहिट ठरली. विशेषतः ‘नजर के सामने जिगर के पास’ हे गाणे आजही प्रेक्षकांचं सर्वात आवडतं गाणं आहे.  या गाण्याबद्दल गीतकार समीर अंजान यांनी एका मुलाखतीत एक खास किस्सा सांगितला होता. त्यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितले की, हे संपूर्ण गाणे अवघ्या 15 मिनिटांत तयार झाले होते.

4 / 5
समीर अंजान यांनी सांगितले की, ते संगीतकार नवीनजींसोबत मराठा मंदिर येथून वर्लीकडे जात होते. प्रवासादरम्यान अचानक त्यांच्या मनात 'नजर के सामने, जिगर के पास…' ही ओळ आली. त्यांनी ती ओळ नवीनजींना सांगितली. त्यानंतर संगीताची धून तयार होत गेली आणि वर्ली सिग्नलपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण गाणे तयार झाले. हा किस्सा आजही चाहत्यांसाठी खूपच रंजक मानला जातो.

5 / 5
विशेष म्हणजे प्रेमात असलेल्या अनेक तरुणांचे हे आवडते गाणे राहिले आहे. तब्बल 36 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. बॉक्स ऑफिसवरही आशिकीने मोठे यश मिळवले होते. हा चित्रपट 1990 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला होता.

Follow Us