AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’वादात! प्रदर्शनादिवशीच मोठा धक्का; कोर्टात काय घडलं?

महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'  या मराठी चित्रपटाच्या नावावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाच्या नावाला आक्षेप घेत छत्रपती संभाजीनगर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव महाराष्ट्राच्या प्रतिमेला आणि 12 कोटी जनतेच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारे असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’वादात! प्रदर्शनादिवशीच मोठा धक्का; कोर्टात काय घडलं?
| Updated on: Nov 20, 2026 | 5:06 PM
Share

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी: ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’  या मराठी चित्रपटाच्या नावावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाच्या नावाला आक्षेप घेत छत्रपती संभाजीनगर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव महाराष्ट्राच्या प्रतिमेला आणि 12 कोटी जनतेच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारे असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. चित्रपटाचे नाव बदलेपर्यंत त्याच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

‘महाराष्ट्राची एपस्टीन फाईल्स’ला धक्का, कोर्टात याचिका दाखल! 

विशेष म्हणजे, हा चित्रपट आज म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती किशोर संत आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांनी गुरुवारी प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले असून, 4 आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या चित्रपटाच्या प्रदर्शनावर या याचिकेचा काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.

“ही घटना भारताबाहेर घडलेली आहे. तिचा महाराष्ट्राशी कोणताही संबंध नाही. मात्र, या घटनेला महाराष्ट्राची जोड देणे हा महाराष्ट्राचा अवमान आहे. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समृद्ध इतिहास आहे. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला एपस्टीन फाइल्सशी जोडणे कितपत योग्य आहे? यामुळे महाराष्ट्राचा  अवमान होत आहे. महाराष्ट्राचा अवमान म्हणजे महाराष्ट्रातील नागरिकांचा अवमान आहे,” असं याचिकाकार्यकर्त्यांचे वकील अॅड. स्वप्निल गवते पाटील यांनी म्हटलं आहे.

चित्रपट आज प्रदर्शित होणार नाही, कोर्टात काय घडलं? 

तसेच  “महाराष्ट्राचा इतिहास आणि संविधानातील अनुच्छेद 21 या संदर्भातील आमची कायदेशीर भूमिका आम्ही न्यायालयासमोर मांडली आहे. न्यायालयाने आमचे सर्व मुद्दे ऐकून प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. प्रतिवादी अर्थात चित्रपटाच्या दिग्दर्शकांच्या वतीने त्यांचे वकील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात उपस्थित होते. प्रतिवादींच्या वकिलांनी खुल्या न्यायालयात निवेदन दिले की, आज चित्रपट प्रदर्शित करणार नाहीत. आज 20 नोव्हेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सर्वत्र सांगितले जात होते. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सेन्सॉर बोर्डाशी संबंधित काही प्रमाणपत्रांची प्रक्रिया बाकी असल्याने चित्रपट आज प्रदर्शित झाला नाही,” असंही स्वप्निल गवते पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Follow Us
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....
Solapur : सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची विहीर कोरडीठाक सोलापुरातील दुष्काळाचं भीषण वास्तव समोर
व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली
Pune Laxmi Road : व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली; पुणे बंदचा इशारा ठरला प्रभावी
सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
Shivendraraje Bhosale : सातारा जिल्हा बँकेच्या निवडीवरून महायुतीत मतभेद? सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...