6 मिनिटांचं हे गाणं, जे पाहून प्रत्येकजण थिएटरमध्ये व्हायचा भावनिक, आजही सुपरहिट, प्रत्येकजण ऐकतो

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काही अशी गाणी आहेत जी खूपच भावनिक आहेत. जी ऐकताच आजही प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात येते पाणी. तरीही लोक आवडीने ऐकतात.

| Updated on: Feb 13, 2026 | 11:15 AM
1 / 6
1981 साली प्रदर्शित झालेल्या क्रांति या भव्य चित्रपटातील ‘जिंदगी की ना टूटे लड़ी’ हे गाणे आजही रसिकांच्या मनात ताजे आहे. 80 च्या दशकात आलेल्या या गाण्याने प्रदर्शित होताच प्रचंड लोकप्रियता मिळवली.

1981 साली प्रदर्शित झालेल्या क्रांति या भव्य चित्रपटातील ‘जिंदगी की ना टूटे लड़ी’ हे गाणे आजही रसिकांच्या मनात ताजे आहे. 80 च्या दशकात आलेल्या या गाण्याने प्रदर्शित होताच प्रचंड लोकप्रियता मिळवली.

2 / 6

सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर आणि गायक नितिन मुकेश यांच्या मधुर आवाजामुळे हे गीत अक्षरशः अमर झाले. पावसाळी वातावरणात चित्रित केलेले हे रोमँटिक आणि हळवे गाणे प्रेक्षकांच्या हृदयाला भिडले.

3 / 6

रेडिओवर हे गाणे वारंवार वाजते आणि त्या काळात ते प्रत्येक घराघरात गुणगुणले जात होते. आजही सोशल मीडियावर या गाण्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात तयार केले जात आहेत. जुने चाहते हे गाणं ऐकून जुन्या आठवणींमध्ये रमून जातात.

4 / 6

विविध विशेष कार्यक्रमांमध्ये आणि चित्रपट महोत्सवांमध्ये हे गाणे वाजल्यावर प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट होतो. त्यामुळेच ‘जिंदगी की ना टूटे लड़ी’ हे गाणे प्रत्येक पिढीला आपलेसे वाटते.

5 / 6

त्या काळात सुमारे 3 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने प्रदर्शित होताच 16 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आणि सुपरहिट ठरला.

6 / 6

हाऊसफुल शो, प्रचंड प्रतिसाद आणि गोल्डन जुबलीचा मान मिळवत ‘क्रांति’ने बॉक्स ऑफिसवर विक्रम प्रस्थापित केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us