Zeenat Aman यांची 5 आयकॉनिक गाणी, आजही आहे लोकप्रिय, संगीत प्रेमीची पहिली पसंत..
बॉलीवूडची ग्लॅमरस अभिनेत्री झीनत अमान ( Zeenat Aman ) ही तिचे सौदर्य, शानदार अभिनय आणि वेगळ्या अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. 70 आणि 80 च्या दशकात झीनत अमान यांची ही 5 गाणी आजही आयकॉनिक आहेत. वाचा झीनत यांची पाच लोकप्रिय गाणी कोणती ?

अभिनेते देव आनंद यांच्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ चित्रपटातील ‘दम मारो दम’ हे अभिनेत्री झिनत अमान ( Zeenat Aman ) वरील गीत आजही बॉलिवूडमधील सर्वात सेन्सेशनल गाणे मानले जाते. या गाण्यात झीनत अमान हीचा बिनधास्त अंदाज आणि प्रेझेन्स प्रेक्षकांना आजही आवडतो. या गाण्याची चाल आणि नृ्त्याचा अंदाज यामुळे हे गाणी हिंदी सिनेमातील आयकॉनिक गाणे मानले जाते.
हिंदी चित्रपट ‘यादों की बारात’ मधील ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ हे रोमँटिक गाणे आजही लोकांना खूप आवडते. Zeenat Aman आणि विजय अरोरा यांच्यावर चित्रीत हे गाणे त्याची सुंदर चाल आणि पिक्चरायझेशनमुळे जास्त पाहिले जाते. या गाण्याची सुरुवातच ग्लासात चमचा वाजण्याची धून ही संगीतकार आर.डी. बर्मन यांच्या संगिताची घरी जादू म्हटली जाते.
बिग शोमॅन राज कपूर यांचा चित्रपट ‘सत्यम शिवम सुंदरम’ मध्ये अभिनेत्री झीनत अमान ( Zeenat Aman ) हीने बोल्ड दृश्ये दिल्याने प्रचंड चर्चेत होता. या चित्रपटातील आध्यात्मिक चाल आणि सुंदर संगीत आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील टायटल ट्रॅक आजही प्रसिद्ध आहे.
निर्माता फिरोज खान यांच्या ‘कुर्बानी’ चित्रपटातील झीनत अमान यांचा ‘लैला ओ लैला’ या चित्रपटातील झीनत अमान ( Zeenat Aman ) हीचा ग्लॅमरस अंदाज सर्वांना भावतो. कल्याणजी-आनंदजी यांच्या संगीतातील हे गाणे बॉलीवूडच्या यादगार डान्स नंबर्समध्ये गणले जाते.
चित्रपट ‘लावारिस’ झीनत अमान आणि अमिताभ बच्चन यांच्यावरील चित्रीत झालेले यांचे ‘कब के बिछड़े हुए हम आज’ गीत आजही दोन्ही अभिनेत्यांची शानदार केमिस्ट्री आणि भावूक अंदाज यामुळे ओळखले जाते. या गीताची सुंदर चाल झीनत अमान यांचा स्क्रीन प्रेझन्समुळे हे गीत प्रसिद्ध आहे.