बॉलिवूडचा आइकॉनिक सीन, शर्मिला टागोर-राजेश खन्ना यांचा रोमान्स सीन पाहण्यासाठी थिएटरबाहेर लोक करायचे गर्दी, आजही तो चर्चेत

बॉलिवूडमधील सर्वात आइकॉनिक सीन, ज्यामध्ये राजेश खन्ना-शर्मिला टागोर यांच्या रोमान्स सीने वेधलेलं सर्वांचं लक्ष. 54 वर्षानंतरही त्याच सीनची होतेय प्रचंड चर्चा.

| Updated on: May 18, 2026 | 12:22 PM
1 / 5
1970 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत रोमँटिक आणि भावनिक कथांचा सुवर्णकाळ सुरू होता. त्या काळात अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं, पण काही चित्रपट असे होते ज्यांचे संवाद आणि सीन आजही लोक विसरू शकलेले नाहीत. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे 'अमर प्रेम'.

2 / 5
1972 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेम, भावना आणि नात्यांचा एक वेगळाच पैलू प्रेक्षकांसमोर मांडला. राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाने त्या काळात बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं होतं. विशेष म्हणजे या चित्रपटातील एक संवाद आजही सोशल मीडियावर तितकाच लोकप्रिय आहे.

3 / 5
'पुष्पा… आय हेट टीअर्स!' हा संवाद हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात आयकॉनिक डायलॉगपैकी एक मानला जातो. या सीनमध्ये शर्मिला टागोर यांच्या डोळ्यांत अश्रू असतात आणि त्यांना पाहून राजेश खन्ना आपल्या खास शैलीत म्हणतात, पुष्पा, मुझसे ये आँसू नहीं देखे जाते… आय हेट टीअर्स.” हा संवाद त्या काळात इतका प्रसिद्ध झाला होता की सिनेमागृहाबाहेरही लोक तो पुन्हा पुन्हा म्हणताना दिसत होते.

4 / 5
या चित्रपटाची कथा साधी असली तरी तिच्यातील भावना प्रेक्षकांच्या मनाला भिडणाऱ्या होत्या. समाजातील नातेसंबंध, एकटेपणा आणि निःस्वार्थ प्रेम यांचं चित्रण अतिशय प्रभावीपणे करण्यात आलं होतं. राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री हा चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉइंट ठरला.

5 / 5
चित्रपटातील गाणीही प्रचंड गाजली होती. विशेष म्हणजे, हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहिला नाही तर त्याने भारतीय समाजातील भावना आणि नात्यांवरही भाष्य केलं. त्यामुळेच 54 वर्षांनंतरही ‘पुष्पा, आय हेट टीअर्स’ हा संवाद लोकांच्या आठवणीत ताजा आहे.

Follow Us