AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, आज मातोश्रीवर मोठे निर्णय होणार? आदेश सुटणार? सर्व आमदारांची..

ठाकरे गटातून मोठी बंडखोरी झाली. तब्बल 6 खासदारांनी पक्षाची साथ सोडली. काही आमदारही शिंदे गटात जाणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. त्यामध्येच ठाकरे गट अलर्ट मोडवर आहे. आज महत्वाची बैठक ठाकरेंच्या आमदारांची बोलवण्यात आलीये.

उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, आज मातोश्रीवर मोठे निर्णय होणार? आदेश सुटणार? सर्व आमदारांची..
Uddhav Thackeray
| Updated on: Jul 07, 2026 | 11:05 AM
Share

उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून मोठी बंडखोरी झाली. 6 खासदारांनी पक्षाची साथ सोडली. थेट लोकसभा अध्यक्षांना या खासदारांनी पत्र लिहित स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत पत्र दिले. दिल्लीत मोठ्या घडामोडी घडतांना दिसल्या. शिवसेना ठाकरे गटाने खासदारांना बैठकीचे व्हिप जारी केले. मात्र, व्हिप जारी केल्यानंतरही हे खासदार बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. यानंतर या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा उद्धव ठाकरे यांच्याकरिता अत्यंत मोठा झटका होता. उद्धव ठाकरे यांनी या 6 खासदारांच्या मतदार संघात जात सभा घेतल्या. यादरम्यान त्यांच्याकडून जोरदार टीका यांच्यावर करण्यात आली. उद्धव ठाकरे मुंबईत दाखल होताच विधान परिषदेच्या उपसभापती पदाकरिता सचिन आहिर यांनी थेट अर्ज भरला. हा उद्धव ठाकरे यांच्याकरिता मोठा दुसरा धक्का ठरला. सचिन आहिर यांचा मोठा जनसंपर्क वरळी मतदार संघात आहे. आदित्य ठाकरेंच्या अत्यंत जवळचे म्हणून सचिन आहिर यांची ओळख होती.

सचिन आहिर यांच्या शिवसेना शिंदे गटाच्या प्रवेशाने थेट झटका बसला. त्यामध्येच अजूनही काही आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. सचिन आहिर यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशानंतर आता उद्धव ठाकरे अलर्ट मोडवर आहेत. त्यांनी तात्काळ आमदारांची बैठक बोलावली आहे. आज सायंकाळी 7 वाजता राज्यातील आमदारांची बैठक मातोश्री येथे पार पडणार आहे.

पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे या आमदारांसोबत संवाद साधणार असल्याची माहिती मिळत आहे. नक्की कोण आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, हे कळू शकले नाही. पण आमदार फुटणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आता शिवसेना ठाकरे गटाच्या या बैठकीकडे राज्याच्या नजरा आहेत. ठाकरे गट अलर्ट मोडवर आहे.

ज्यावेळी खासदारांच्या फुटीच्या चर्चा रंगल्या होत्या, त्यावेळीही ठाकरेंकडून मातोश्रीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कारण राज्यात अजूनही शिंदेंचे ऑपरेशन टायगर सुरू आहे. ठाकरे गटाला मोठा धक्का शिंदे देऊ शकतात. या बैठकीला नक्की कोण कोण आमदार दाखल होतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ