AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंचे धक्कातंत्र सुरूच… आठ दिवसात दुसरा मोठा धक्का… अजून कोण फुटणार?

Sachin Ahir Legislative Council Deputy Chairman: ठाकरे सेनेलाच नाही तर सर्वांनाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे. सचिन अहिर विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा अर्ज भरला आहे. आज अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. शिंदे यांनी पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राबवले आणि अहिर यांना उपसभापती पदी घेण्याचा निर्णय घेतला.

एकनाथ शिंदेंचे धक्कातंत्र सुरूच... आठ दिवसात दुसरा मोठा धक्का... अजून कोण फुटणार?
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, नीलम गोऱ्हेImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jun 30, 2026 | 12:29 PM
Share

Eknath Shinde – Uddhav Thackeray- Sachin Ahir: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ दिवसात उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का बसला. उद्धव ठाकरे हे विदर्भ आणि मराठवाडा दौऱ्यावरून परत येताच शिंदे सेनेने ऑपरेशन टायगर राबवले. कुणालाही थांगपत्ता न लागू देता हे ऑपरेशन करण्यात आले. सचिन अहिर हे थेट विधान परिषद उपसभापती पदाचा अर्ज भरतानाच समोर आले. त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. वरळी विधानसभा मतदारसंघात सचिन अहिर यांची मोठी ताकद आहे. यापूर्वी शिंदे सेनेने 6 खासदार फोडले. त्यानंतर आठच दिवसात हा मोठा धक्का मानल्या जात आहे.

6 खासदारानंतर दुसरा धक्का

याच महिन्यात उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी मोठा धक्का दिला. ऑपरेशन टायगरमध्ये मराठवाडा, विदर्भ, अहिल्यानगर आणि मुंबईतील खासदारांना सुरूंग लावल्या गेला. गेल्या आठवड्यात राज्यात हायहोल्टेज ड्रामा रंगला होता. खासदारानंतर आता ऑपरेशन टायगरमध्ये उद्धव ठाकरे गटाचे सर्व आमदार संपर्कात असल्याचा दावा शिंदे सेनेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या आठ दिवसानंतर आगामी काळात उद्धव सेनेला पुन्हा धक्कातंत्र देण्याची तयारी शिंदे सेनेने केल्याचे मानले जाते.

संजय दिना पाटील

संजय जाधव

संजय देशमुख

नागेश आष्टीकर पाटील

भाऊसाहेब वाकचौरे

ओमराजे निंबाळकर

हे खासदार फुटल्यानंतर आता आमदार सचिन अहिर हे सुद्धा शिंदे गटात दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या मतदारसंघातच फुटीचे मोठे बीज रोवल्या गेल्याने हा मोठा धक्का मानल्या जात आहे. उद्धव ठाकरे यांचे कोण कोणते नेते आणि आमदार शिंदे सेनेच्या वाटेवर आहेत याची चर्चा सुरू आहे.

क्रमवार यादीत कोण कोण?

आता कोणते आमदार शिंदे सेनेत येतील असा प्रश्न मंत्री आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांना विचारला असता. क्रमवार यादी तयार आहे. त्यातील कुणाला कधी घ्यायचे याचा निर्णय उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथ शिंदे घेतील असे सूचक वक्तव्य शिरसाट यांनी केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ठाकरे सेनेला अजून धक्के बसण्याची शक्यता आहे.

घराणेशाही करेल तो बर्बाद होईल

घराणेशाही करेल तो बर्बाद होईल अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्यांनी 2019 मधील घडामोडींवर मोठी टीका केली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर त्यांनी टीका केली. ठाकरे यांनी पाठ फिरवताच यवतमाळ आणि इतर ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले.

Follow Us
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी