57 वर्षांपूर्वीच रोमँटिक गाणं, जे आजही प्रेक्षकांच्या मनावर करत आहे राज्य, एकदा ऐकलं की दिवसभर गुणगुणतात लोक
57 वर्षांपूर्वीचं 5 मिनिट 34 सेकंदाच रोमँटिक गाणं. ज्याची आजही आहे चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ. आजही कुठे जरी ऐकलं तरी चाहते दिवसभर गुणगुणतात.

सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चित्रपटांपेक्षा त्यामधील गाण्यांची सर्वात जास्त चर्चा होते. ही गाणी कितीही वर्षे उलटली तरी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. असचं एक 5 मिनिट 34 सेकंदाचं रोमँटिक गाणं जे 57 वर्षांनंतर देखील प्रत्येकजण ऐकताच गुणगुणतो.

हिंदी चित्रपटांमध्ये रोमँटिक गाण्यांची परंपरा खूप जुनी आहे. साधे पण हृदयाला भिडणारे शब्द, सुरेल धून आणि पडद्यावर हिरो-हिरोईनचा गोड रोमान्स यामुळे ही गाणी प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिली.

अशाच जुन्या आणि लोकप्रिय रोमँटिक गाण्यांपैकी एक म्हणजे जे हम-तुम चोरी से. हे गाणे 1969 साली प्रदर्शित झालेल्या 'धरती कहे पुकार के' या चित्रपटातील आहे. हे गाणं ऐकताच अनेकांच्या चेहऱ्यावर आपोआप हसू येते.

छेडछाड भरलेला रोमँटिक अंदाज हे त्या काळातील चित्रपटांचे खास वैशिष्ट्य होते आणि हे गाणे त्याचे उत्तम उदाहरण मानले जाते. आजच्या डिजिटल युगातही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. यूट्यूबवर या गाण्याचे अनेक व्हिडिओ उपलब्ध असून काहींना कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत.

चित्रपटातील इतर गाणीही लोकप्रिय झाली होती, मात्र ‘जे हम-तुम चोरी से’ हे गाणं आजही जुन्या गाण्यांच्या चाहत्यांच्या प्लेलिस्टमध्ये कायम ऐकायला मिळते. आजही या गाण्याची क्रेझ कायम असल्याचे दिसते.