
सैराट फेम रिंकू राजगुरूने अल्पावधीतच चित्रपटासृष्टीत आपले मानाचे स्थान निर्माण केले आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटद्वारे तिने चित्रपटसृष्टीत आपले पहिले पाऊल टाकले.

6 years of sairat हार्ट इमोजींचे चे कॅप्शन देत रिंकूने सैराटमधील आपल्या टीम सोबतचे जुने फोटो शेअर केले आहेत.

या चित्रपटाच्या निर्मितीला आज सहा वर्षेपूर्ण झाली आहेत. या निमित्ताने जुन्या आठवणीना उजाळा देत रिंकूने आपले फोटो शेअर केले आहेत. या चित्रपटासाठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

सैराट चित्रपटानंतर रिंकूने कागर त्यानंतर काही महिन्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्र झुंड चित्रपटातूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली.

सैराटच्या यशानंतर अल्पावधीतच रिंकूने आपल्या स्वतःचा स्वतंत्र असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सोशल मीडियावर आपले फोटो शेआर करत चाहत्याना कायम अपडेट्स देत असते.