68 वर्षांपूर्वीचं रोमँटिक गाणं, आजही लोक सर्च करून ऐकतात, इतकं लोकप्रिय की पुन्हा-पुन्हा ऐकू वाटतं

1958 मधील 3 मिनिट 15 सेकंदाचं रोमँटिक गाणं, जे आजही तरुणांचं अत्यंत आवडतं. इतक्या वर्षांनंतर देखील लोक सर्च करून ऐकतात.

| Updated on: Mar 24, 2026 | 3:30 PM
1 / 6
जुन्या हिंदी गाण्यांची जादू आजही रसिकांच्या मनावर तितक्याच ताकदीने अधिराज्य गाजवत आहे. या गाण्यांमध्ये असलेला साधेपणा, गोडवा आणि सुरेलता आजच्या गाण्यांपेक्षा वेगळीच वाटते. त्यामुळेच अनेक वर्षांनंतरही ही गाणी ऐकताना मनाला एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळते.

2 / 6
1958 साली प्रदर्शित झालेलं ‘ये रातें ये मौसम’ हे गाणं त्या काळातील अत्यंत लोकप्रिय आणि गाजलेलं रोमँटिक गाणं ठरलं. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी आपल्या सुरेल आवाजात हे गाणं गायले असून त्यावेळी प्रेक्षकांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला होता.

3 / 6
या गाण्याची खासियत म्हणजे त्यातून उभा राहणारा रोमँटिक माहोल. त्या काळात लोक हे गाणं रेडिओवर ऐकत आणि मित्रमंडळींसोबत शेअर करत असत. या गाण्याचा प्रभाव इतका मोठा होता की, चित्रपटाच्या यशातही त्याचा मोलाचा वाटा होता.

4 / 6
या सुंदर गाण्याला संगीत रवि यांनी दिलं होतं तर गीतकार शैलेंद्र यांनी त्याचे बोल लिहिले होते. या दोघांच्या अप्रतिम संगमामुळे हे गाणं अधिकच खास बनलं. त्यात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजाने जणू चार चांद लावले.

5 / 6
त्या काळात हे गाणं सर्वत्र ऐकू येत होतं आणि अनेक प्रेक्षक केवळ हे गाणं ऐकून चित्रपट पाहायला जात होते. आजही जेव्हा ही धून कानावर पडते, तेव्हा लोक लगेच ओळखतात आणि जुन्या आठवणींमध्ये रमून जातात.

6 / 6
 हे गाणं केवळ त्या काळापुरतंच मर्यादित राहिलं नाही तर आजही तरुणांमध्येही ते तितकंच लोकप्रिय आहे. आजच्या सोशल मीडियाच्या युगातही या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळतात आणि तरुण पिढीही ते आवर्जून ऐकत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us