8th Pay Commission बद्दल मोठी अपडेट! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात लवरकरच होणार वाढ, किती?

8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमका किती बदल होणार? 2.15 फिटमेंट फॅक्टर आणि DA विलिनीकरणामुळे काय होणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

| Updated on: Oct 10, 2026 | 1:17 PM
1 / 6
8व्या वेतन आयोगाच्या पथकाकडून कर्मचाऱ्यांच्या वेतन, पेन्शन आणि भत्त्यांबाबत चर्चा सुरू आहे. बंगळुरूनंतर इतर शहरांमध्येही कर्मचारी आणि पेन्शनर्सच्या मागण्या जाणून घेतल्या जाणार आहेत.

8व्या वेतन आयोगाच्या पथकाकडून कर्मचाऱ्यांच्या वेतन, पेन्शन आणि भत्त्यांबाबत चर्चा सुरू आहे. बंगळुरूनंतर इतर शहरांमध्येही कर्मचारी आणि पेन्शनर्सच्या मागण्या जाणून घेतल्या जाणार आहेत.

2 / 6

महागाई भत्ता (DA) मूळ पगारात विलीन झाल्यास कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात मोठी वाढ होऊ शकते. यानंतर नव्या वेतन रचनेत DA ची गणना पुन्हा शून्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.

3 / 6

फिटमेंट फॅक्टर 2.15 पट गृहीत धरल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात लक्षणीय वाढ होऊ शकते. मात्र अंतिम फिटमेंट फॅक्टर आयोगाच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल.

4 / 6

लेव्हल 6 चा सध्याचा बेसिक पगार 35,400 आहे. दिलेल्या अंदाजानुसार DA विलिनीकरण आणि 2.15 फिटमेंट फॅक्टरनंतर पगारात मोठी वाढ होऊ शकते.

5 / 6

लेव्हल 7 आणि 8 मधील कर्मचाऱ्यांनाही नव्या वेतन रचनेचा फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्यक्ष पगार आयोगाचा अंतिम अहवाल आणि सरकारच्या निर्णयानंतरच निश्चित होईल.

6 / 6

वेतन आयोगाचा अहवाल, सरकारची मंजुरी आणि त्यानंतरची अधिसूचना हे महत्त्वाचे तीन टप्पे आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष पगारवाढीसाठी कर्मचाऱ्यांना या संपूर्ण प्रक्रियेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us