
Salary Hike And Pension: 8 व्या वेतन आयोगाला गेल्यावर्षी सरकारने मंजूरी दिली होती. मागील वेतन आयोग नवीन वेतन धोरणानुसार संपुष्टात आला आहे. नवीन वेतन आयोग लागू होण्यास अजून दोन वर्षे लागतील. या कालावधीतील एरियस देण्यात येईल. नवीन वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे. तर त्यांचे निवृत्ती वेतनही वाढेल.

8 व्या वेतन आयोगातंर्गत केंद्र सरकार काही कर्मचारी आणि पेन्शनर्सचे वेतन आणि निवृत्ती वेतन वाढवणार आहे. सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील जनरल इन्शुरन्स कंपन्या (PSGICs), नाबार्ड आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन वाढीला मंजूरी दिली आहे.

अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, आर्थिक क्षेत्रातील सेवानिवृत्तीधारकांना आणि कर्मचाऱ्यांना सामाजिकी सुरक्षा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. या निर्णयामुळे 8 व्या वेतन आयोगाच्या एक एक प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे समोर येत आहे.

या निर्णयामुळे जवळपास 46,322 कर्मचारी, 23,570 पेन्शनधारक आणि 23,260 कुटुंबाच्या पेन्शनधारकांना फायदा होईल. सरकारच्या मते, 8 व्या वेतन आयोग लागू झाल्याने काही कर्मचारी, त्यांचे कुटुंबिय आणि सेवानिवृत्तीधाराकांना मोठा फायदा होईल.

सार्वजनिक सेवा क्षेत्रातील विमा कंपन्यातील (PSGICs) कर्मचाऱ्यांसाठी 8 व्या वेतन आयोगातंर्गत नवीन वेतन संशोधन होईल. PSGIC च्या कर्मचाऱ्यांसाठी वेतन संशोधन 01.08.2022 पासून लागू होणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतनात एकूण 12.41 टक्क्यांची वाढ होईल. तर बेसिक पे आणि महागाई भत्त्यात 14 टक्क्यांची वाढ होईल.

सरकारने नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंटचे (NABARD) कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी वेतन आणि पेन्शन संशोधनाला मंजूरी दिली आहे. त्यांचे हे नवीन वेतन 1 नोव्हेंबर, 2022 रोजीपासून लागू होईल. NABARD चे 'A', 'B' आणि 'C' श्रेणीतील कर्मचाऱ्यांना वेतन आणि भत्त्यात जवळपास 20 टक्क्यांची वाढ होईल.