ब्रेकअप होताच प्रत्येक कपलच्या ओठांवर असतं हे गाणं, पुन्हा-पुन्हा ऐकतात, 30 वर्षांपूर्वी झालेलं रिलीज

ब्रेकअप होताच प्रत्येक कपलच्या ओठांवर असतं हे 90 च्या दशकातील गाणं, पुन्हा-पुन्हा ऐकतात लोक. आजही हे गाणं YOutube वर करतेय ट्रेंड.

| Updated on: May 18, 2026 | 4:00 PM
1 / 5
90 चं दशक हे बॉलिवूडमधील संगीत आणि मसाला चित्रपटांचं सुवर्णयुग मानलं जातं. त्या काळात अनेक अशी गाणी आली, जी आजही लोकांच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहेत. लग्नसमारंभ, पार्टी किंवा सोशल मीडियावरील रील्समध्ये अजूनही ही गाणी ऐकायला मिळतात.

2 / 5
अशाच एका सुपरहिट आणि आयकॉनिक गाण्याची आजही प्रेक्षकांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे आणि ते म्हणजे 'तुम तो धोखेबाज हो'. हे गाणं 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'साजन चले ससुराल' या चित्रपटातील आहे. गाणं रिलीज होताच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलं होतं.

3 / 5
या गाण्यात गोविंदा आणि करिश्मा कपूर यांची धमाल केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. त्या काळात ही जोडी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानली जायची. गोविंदाचा विनोदी अंदाज, भन्नाट डान्स आणि करिश्माची ऊर्जा यामुळे हे गाणं आणखी खास बनलं होतं.

4 / 5
दोघांचे डान्स स्टेप्स आणि स्क्रीनवरील ट्युनिंग प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावणारी ठरली. त्यामुळे हे गाणं केवळ चित्रपटापुरतं मर्यादित राहिलं नाही तर लोकांच्या आठवणींचा एक भाग बनलं.

5 / 5
या चित्रपटात अनेक गाणी होती, पण त्यापैकी ‘तुम तो धोखेबाज हो’ हे गाणं सर्वाधिक लोकप्रिय ठरलं. आजही हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसतं आणि प्रत्येक पिढीतील लोक ते आवडीने ऐकतात.

Follow Us