इतकी सुंदर अभिनेत्री की सौंदर्य पाहून लोक व्हायचे थक्क, 34 वर्षांपूर्वीचा Video चर्चेत

34 वर्षानंतर अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाला दिव्या भारतीचा एक जुना व्हिडीओ. सौंदर्य आणि तिची स्माईल पाहून अनेकजण करत आहेत कौतुक.

| Updated on: Jul 09, 2026 | 12:35 PM
1 / 5
90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री दिव्या भारती आज आपल्या सोबत नसली तरी तिची लोकप्रियता आजही कायम आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा सुमारे 34 वर्षांपूर्वीचा एक जुना व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये ती पाकिस्तानचे दिग्गज विनोदी कलाकार मोईन अख्तर यांच्यासोबत दुबईतील एका लाइव्ह स्टेज शोमध्ये दिसत आहे.

2 / 5

या व्हिडिओमध्ये दिव्या भारतीचा निरागस स्वभाव, साधेपणा आणि मोहक व्यक्तिमत्त्व पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनाला भावले आहे. कार्यक्रमादरम्यान मोईन अख्तर यांनी त्यांच्या खास विनोदी शैलीत आणि हजरजबाबीपणाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले.

3 / 5

दिव्या भारतीची प्रशंसा करताच तिने हसत, 'माझी एवढी स्तुती का करत आहात?' असा प्रश्न विचारला. त्यावर मोईन यांनी, 'तुम्हालाच तर स्वतःची स्तुती करणारी माणसं आवडतात,' असे मिश्कील उत्तर देत संपूर्ण सभागृहात हास्याची लाट निर्माण केली. हा व्हिडीओ viraltimesindia या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

4 / 5

शोदरम्यान मोईन अख्तर यांनी मिमिक्री, शायरी आणि विनोदी किस्स्यांमधून रंगत आणली तर दिव्या भारतीसोबतची त्यांची हलकीफुलकी नोकझोक प्रेक्षकांसाठी संस्मरणीय ठरली. त्यामुळे हा कार्यक्रम त्या काळातील सर्वाधिक गाजलेल्या स्टेज शोपैकी एक मानला जातो.

5 / 5

दिव्या भारतीने अत्यंत कमी वयात बॉलिवूडमध्ये पदार्पण करून सुपरहिट चित्रपटांमधून मोठी लोकप्रियता मिळवली होती. दुसरीकडे, मोईन अख्तर हे पाकिस्तानातील आघाडीचे अभिनेते आणि विनोदी कलाकार म्हणून ओळखले जात होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us