
आपल्या शेजारील नेपाळमध्ये भारताच्या रेल्वे स्थानकातून ट्रेन सुटते. तर पाकिस्तान आणि बांग्लादेशात जाण्यासाठी ट्रेन आहेत. परंतू त्यांची रेल्वे स्थानके वेगळी आहेत. चला तर आपण पाहूयात कोणत्या देशात जाण्यासाठी भारतातून ट्रेन सुटतात.

भारताच्या जयनगर रेल्वे स्थानकातून नेपाळसाठी ट्रेन जाते. मधुबनी जिल्ह्यातील भारताचे हे शेवटचे रेल्वे स्थानक मानले जाते. नेपाळच्या जनकपूर पर्यंत जाण्यासाठी येथून थेट ट्रेन मिळते.नेपाळचे स्थानक भारतीय स्थानकाच्या भिंती पलिकडे आहे. तेथे जाण्यासाठी ओव्हर ब्रिज आहे. या स्टेशनवर प्रवासी तपासणी झाल्यानंतर थेट नेपाळ जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढू शकतात.

बिहार - नेपाळ सीमेजवळ स्थित रक्सौल जंक्शन नेपाळ जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुख्य ट्राझिस्ट पॉईंट मानला जातो. याला नेपाळचे मुख्य प्रवेशद्वार देखील म्हटले जाते. येथून भारताच्या अनेक भागांना नेपाळला जोडणाऱ्या ट्रेन जातात.

पश्चिम बंगाल स्थित पेट्रोपोल रेल्वे स्थानक भारत-बांग्लादेश सीमेवरील मोठे ट्रान्झिस्ट हब आहे. ब्रिटीशकाळात बनलेले हे स्थानक ब्रॉड गेज लाईनने बांग्लादेशातील खुलनाशी जोडलेले आहे. येथून बंधन एक्सप्रेस जाते. परंतू प्रवासासाठी पासपोर्ट आणि व्हीसाची गरज लागते.

पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर स्थित राधिकापूर रेल्वे स्थानक भारत-बांग्लादेश रेल ट्रान्झिस्टचे पॉईंट आहे. येथून दोन्ही देशांच्या दरम्यान मालगाडी आणि प्रवासी गाड्यांची येजा होते. ही सीमा चौकी म्हणूनही कार्यरत आहे.

हल्दीबाडी रेल्वे स्थानक बांग्लादेशाच्या सीमेपासून केवळ ४ किमी अंतरावर आहे. येथे चिलहाटी स्थानकाद्वारे दोन्ही देश जोडलेले आहेत. या मार्गावर भारतातून ढाकापर्यंत ट्रेन जाते आणि लोक व्यापार आणि प्रवासासाठी याचा वापर करतात.

अटारी भारत-पाकिस्तान रेल्वे संपर्कचा सर्वात मोठे आणि प्रमुख स्थानक आहे.आधी या मार्गाने समझौता एक्सप्रेस धावायची. ही ट्रेन भारताच्या अटारीतून पाकिस्तानच्या लाहोरपर्यंत जायची. हे स्थानक भारत - पाकिस्तानच्या सीमेरेषेच्या एकदम जवळ आहे. आणि पाकिस्तान प्रवासाच मुख्य गेटवे मानले जाते.

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील मुनाबाव रेल्वे स्थानक पाकिस्तानच्या कराची- खोखरापार मार्गाने जोडलेले आहे. या मार्गावर थार लिंक एक्सप्रेस चालत होती. हा दोन्ही रेल्वे स्थानका दरम्यानचा दुसरा मोठा रेल्वे संपर्क पॉईंट होता. तसेच या स्थानकावर कडक सुरक्षा असते. तसेच प्रवासासाठी पासपोर्ट आणि व्हीसाची गरज लागते. परंतू सध्या भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशात दरम्यान धावणाऱ्या ट्रेन बंद आहे.