
राजस्थानातील जोधरपुरात बीएपीएस श्री स्वामिनारायण मंदिराच्या भव्य प्राणप्रतिष्ठा महोत्सवात महिलांसाठी विशेष रुपाने समर्पित ‘महिला दिना’चे आयोजन श्रद्धा, भक्ती आणि उल्हासासह संपन्न झाले. नवरात्री निमित्ताने केलेले हे आयोजन मातृशक्ती सन्मान आणि योगदानाप्रती कृतज्ञता प्रकट करण्याचा हा भावपूर्ण प्रयत्न होता.

या महोत्सवाच्या विशेष आयोजनात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.यात प्रेरणादायी प्रवचन, व्हिडीओ प्रदर्शन आणि विशिष्ट अतिथींचे उद्बोधन करण्यात आले.समाजात महिला शक्तीचे अमूल्य योगदान रेखांकित केले गेले.

या वेळी बीएपीएस जोधपुर महिला मंडलाच्या वतीने दुर्गाबेन सोलंकी यांनी 'मंदिर की महिमा'या विषयावर प्रेरणादायी प्रवचन केले. आपल्या प्रवचनात त्यांनी संप्रदायात महिला प्रवृत्तीची महत्वपूर्ण भूमिका, बाल शिक्षण आणि कुटुंबाच्या एकतेत मंदिराची केंद्रीय भूमिका यावर सारगर्भित विचार मांडले.

हा 'महिला दिवस' केवळ समाजातील स्री शक्तीच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक योगदानाला नमन करण्याची संधी मिळाली, शिवाय उपस्थित सर्व महिलांना धर्म, सेवा आणि मूल्यनिष्ठ जीवनाच्या प्रती आणि दृढ प्रेरणा प्रदान करण्यात आली.

राजस्थानातील जोधपूर येथे बीएपीएस श्री स्वामिनारायण मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु आहे. या सोहळ्यात नवरात्री निमित्त समर्पित ‘महिला दिनाचे’चे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त नारी शक्तीचे अनोखे दर्शन झाले.