
रस्त्यांवरील खड्ड्यामुळे अनेकदा वाहनांचे अपघात होऊन त्यांचे प्राण जात असतात. आता मात्र जोगेश्वरीतील मेट्रो स्थानकाच्या खालील खड्ड्यात एका तरुणाचा पाय अडकल्याची घटना काल रात्री उशीरा घडली.

जोगेश्वरी मेट्रो स्टेशन खालील रस्त्यातील एका खड्ड्यात एका तरुणाचा अचानक पाय गेला आणि तो अडकून बसल्याने अग्निशमन दल, पोलिस आणि संबंधित यंत्रणांना बोलावण्याची वेळ आली.

काल रात्री उशीरा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळील जोगेश्वरी मेट्रो स्थानकाच्या खाली रस्त्यावरील खड्ड्यात एका तरुणाचा पाय गेला आणि तो तरुण अडकूनच बसला. अनेकांनी प्रयत्न करुनही या तरुणाला काही बाहेर काढता आले नाही. त्यानंतर तेव्हा अग्निशमन दल आणि पोलिसांची टीम आली आणि त्यांनी खड्डा खोदला आणि या तरुणाला कसेबसे बाहेर काढले.

या भागात रात्रीत एकच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर या तरुणाचा पाय या खड्ड्यात अडकला. सुमारे तीन ते चार तासांच्या मेहनतीनंतर या तरुणाची सुटका करणे शक्य झाले.

या भागात रात्री १ वाजण्याच्या दोन गटात मारामारी झाली. त्यावेळी या तरुणाचा पाय या खड्ड्यात नेमका अडकला. अग्निशमन दलाने खड्डा खणून या तरुणाला अखेर बाहेर काढले तेव्हा सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. रस्त्यावरील या खड्ड्याला जबाबदार कोण ? असा सवाल केला जात आहे.