बॉबी देओलसोबत मराठमोळ्या अभिनेत्रीचे इंटिमेट सीन्स; म्हणाली ‘शूट करताना मर्यादा..’

इंटिमेट सीन्स शूट करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते, याविषयी ही मराठमोळी अभिनेत्री एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली. या अभिनेत्रीने बॉबी देओलसोबत काही इंटिमेट सीन्स शूट केले होते.

| Updated on: Aug 26, 2026 | 12:20 PM
1 / 6
'आश्रम' या वेब सीरिजमध्ये पम्मीची भूमिका अभिनेत्री अदिती पोहणकर घराघरात पोहोचली. या सीरिजमध्ये तिची आणि अभिनेता बॉबी देओलची केमिस्ट्रीही चर्चेत राहिली. दोघांनी काही इंटिमेट सीन्सही शूट केले होते. आता अदितीने या सीन्सच्या शूटिंगदरम्यानचा अनुभव आणि कलाकारांमधील कम्फर्ट लेव्हलबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

'आश्रम' या वेब सीरिजमध्ये पम्मीची भूमिका अभिनेत्री अदिती पोहणकर घराघरात पोहोचली. या सीरिजमध्ये तिची आणि अभिनेता बॉबी देओलची केमिस्ट्रीही चर्चेत राहिली. दोघांनी काही इंटिमेट सीन्सही शूट केले होते. आता अदितीने या सीन्सच्या शूटिंगदरम्यानचा अनुभव आणि कलाकारांमधील कम्फर्ट लेव्हलबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

2 / 6

अदितीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, इंटिमेट सीन्स शूट करताना कलाकारांमध्ये परस्पर विश्वास आणि संवाद असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा प्रसंगांमध्ये दोन्ही कलाकारांनी कम्फर्टेबल आणि सुरक्षित वाटणं गरजेचं असल्याचं ती म्हणाली.

3 / 6

अदितीच्या मते, कॅमेऱ्यासमोर केमिस्ट्री दाखवण्याआधी कलाकारांमध्ये एकमेकांशी मोकळेपणाने संवाद होणं आवश्यक आहे. शूटिंगदरम्यान समोरच्या व्यक्तीला काही अडचण आहे का, ती कम्फर्टेबल आहे का, याची जाणीव ठेवणं महत्त्वाचं असल्याचं तिने सांगितलं.

4 / 6

अदितीने इंटिमेट सीन्सबाबत बोलताना कलाकारांनी आपापल्या मर्यादा समजून घेणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलं होतं. तिच्या मते, अशा सीन्समध्ये कोणत्याही कलाकाराला भीती किंवा अस्वस्थता वाटता कामा नये. परस्पर विश्वास असेल तर सीन अधिक सहजपणे शूट करता येतो.

5 / 6

तिने 'शी' आणि 'आश्रम' या दोन्ही प्रोजेक्ट्समध्ये अशा सीन्ससाठी संवाद आणि कम्फर्टला महत्त्व दिल्याचं सांगितल होतं. बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन शूट करणं तिच्यासाठी एक वेगळाच अनुभव असल्याचं अदितीने सांगितलं. एका मुलाखतीत तिने मजेशीर किस्साही शेअर केला.

6 / 6

शूटिंगदरम्यान ती बॉबीला वारंवार "मी ठीक आहे" असं सांगत होती. त्यावर बॉबीने तिला "तू इतकी चिल कशी आहेस पम्मी?", असं विचारल्याचं अदितीने सांगितलं. बॉबी तिला पम्मी या नावानेच हाक मारत असे. 'आश्रम' या वेब सीरिजमध्ये अदितीने पम्मीची भूमिका साकारली होती, तर बॉबी देओल बाबा निरालाच्या भूमिकेत होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us