
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांना विशेष आवडत होती. या मालिकेतील अरुंधीत या पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली होती. पण काही दिवसांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता मुधराणी कोणत्या मालिकेत दिसणार असा प्रश्न सर्वांना पडला होता.

मधुराणी प्रभुलकरने नुकताच 'मित्र म्हणे' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या पॉडकास्टमध्ये तिने तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी खुलासा केला आहे.

मधुराणी ही लवकरच एका सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये तिच्या या सिनेमाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

'महाराष्ट्रातील एक तपस्वी दर्जाच्या शास्त्रीय गायिकेवर एक चित्रपट येत आहे. त्या चित्रपटात मी काम करणार आहे' असा खुलासा मधुराणीने केला आहे.

मधुराणी लवकरच एका म्युझिकल बायोपिकमध्ये दिसणार आहे. पण तिने या चित्रपटाचे नाव सांगितलेले नाही.