
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. आमिरने त्याचं रिलेशनशिप जगजाहीर केल्यापासून फोटोग्राफर्स आणि पापाराझींचं गौरीवर विशेष लक्ष असतं. त्यामुळे ती कुठेही गेली तरी तिच्या मागे पापाराझी असतातच.

नुकतंच गौरीला मुंबईतील एका ठिकाणी पाहिलं गेलं. यावेळी पापाराझी तिचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक करताना दिसले. परंतु या गोष्टीमुळे गौरी त्यांच्यावर चांगलीच चिडली होती. सुरुवातीला तिने विनंती केली की, माझे फोटो काढू नका. परंतु जेव्हा पापाराझींनी ऐकलं नाही, तेव्हा ती त्यांच्यावर भडकली.

रागाच्या भरात गौरी पापाराझींना म्हणाली, "अरे, मला एकटं सोडा. मी फक्त वॉक करायला जातेय." असं म्हणून ती तिथून निघून गेली. गौरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये अनेकांनी गौरीची बाजू घेतली आहे. 'पापाराझींनी हा मूर्खपणा आता बंद करावा. काहींना हे सर्व आवडत नाही. त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर करा', असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

आमिर आणि त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट हे सध्या लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. दोघांच्या कुटुंबीयांनाही याची माहिती आहे. आमिरचा दोन वेळा घटस्फोट झाला असून आपल्या साठाव्या वाढदिवशी त्याने गौरीसोबतचं नातं माध्यमांसमोर जाहीर केलं होतं.