
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची एकुलती एक मुलगी आराध्या बच्चन कायम चर्चेत असते. 14 वर्षांची आराध्या सेलिब्रिटी किड्समध्ये देखील लोकप्रिय आहे. आराध्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

आराध्या बच्चन 14 वर्षांची झाली आहे.. आराध्या स्टार आई ऐश्वर्या राय बच्चनपेक्षा कमी सुंदर नाही. आराध्या बहुतेकदा तिच्या आईसोबत राहते. ऐश्वर्या देखील आराध्यासोबत अनेक फोटो पोस्ट करत असते.

ऐश्वर्या हिने लेक आराध्या हिच्यासोबत पॅरिस फॅशन वीकमध्ये अनेक वेळा हजेरी लावली आहे. आराध्याचा अविश्वसनीय आत्मविश्वासही इथे दिसून आला आहे. लहानपणापासून आराध्या आईसोबत पॅरिस फॅशन वीकमध्ये हजेरी लावते.

आराध्याला तिच्या आईसोबत अनेकदा विमानतळावर पाहिलं जातं, जिथे लोक तिच्या सौंदर्याने आणि उंचीने थक्क होतात. 14 व्या वर्षी आराध्या हिची उंची तिच्या आई एवढी झाली आहे. आराध्याच्या लूकची देखील चर्चा होत असते.

आराध्या सध्या धीरुबाई अंबानी शाळेत शालेय शिक्षण पूर्ण करत आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आराध्या उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे...