
क्रिकेट चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा दक्षिण आफ्रिकेचा धाकड खेळाडू एबी डिव्हिलिअर्सने यावर्षी क्रिकेटला अलविदा केले आहे. तो त्याच्या आक्रमक फलंदाजीने अनेकांना धडकी भरवत होता.

याचवर्षी निवत्त झालेला दक्षिण अफ्रिकेचा दुसरा दिग्गज खेळाडू म्हणजे डेल स्टेन. डेल स्टेन वेगवान गोलंदाची धुरा संभाळत होता. त्याच्या वेगाला फलंदाज इतके घाबरायचे की, कित्येक जणांच्या तो स्वप्नातही यायचा.

वेस्ट इंडिजचा धाकड ऑलराऊंडर ब्राव्होही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्याने आयपीएलमध्येही चेन्नईकडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे.

भारताचा सिक्सर किंग युसूफ पठान यानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं आहे. युसूफ आणि इरफान या जोडीने भारतासाठी अनेकदा मैदान गाजवले आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज विनय कुमारनेही निवृत्ती घेतली आहे. त्याने अनेक सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज अशोक दिंडा यानेही क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने आयपीएलमध्येही चमकदार कामगिरी केली आहे.

या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ता झालेला तिसरा भारतीय खेळाडू म्हणजे नमन ओझा. त्याने 15 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

श्रीलंकन खेळाडू उपूल थरंगा यांनेही क्रिकेटला अलविदा केले आहे. त्याने अनेक सामन्यात श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्वही केले आहे. तसेच त्याने अनेकदा विकेटकिपिंगची धुराही संभाळली आहे.

याचवर्षी श्रीलंकेचा दुसरा खेळाडू आणि वेगवान गोलंदाज धमिका प्रसादनेही क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.