अभिषेक बच्चन की ऐश्वर्या राय, कोणाकडे सर्वाधिक संपत्ती, कोण कमावतं जास्त?

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत प्रसिद्ध आणि श्रीमंत जोडप्यांपैकी एक आहेत. दमदार चित्रपट आणि हाय-प्रोफाइल ब्रँड एंडोर्समेंट यांसाठी दोघंही ओळखले जातात. चित्रपट, मोठमोठ्या ब्रँड्सच्या जाहिराती आणि आलिशान रिअल इस्टेट यांमधून त्यांची जोरदार कमाई होते.

| Updated on: Feb 08, 2026 | 9:43 AM
1 / 5
अभिषेक बच्चन हा अभिनेता आणि निर्मातासुद्धा आहे. त्याने 'धूम', 'गुरू', 'बंटी और बबली' यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलंय. 'सेलिब्रिटी नेट वर्थ'ने दिलेल्या माहितीनुसार, त्याची एकूण संपत्ती ही 33 ते 34 दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास 275 ते 285 कोटी रुपये इतकी आहे. चित्रपट, प्रॉडक्शन आणि स्पोर्ट्स बिझनेसमधून त्याची कमाई होते.

2 / 5
ऐश्वर्या राय ही गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करतेय. तिने हिंदीसोबतच तमिळ चित्रपटसृष्टीतही भूमिका साकारल्या आहेत. 1994 मध्ये 'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकल्यानंतर तिने जगभरातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये आपलं स्थान मिळवलं. ऐश्वर्याची एकूण संपत्ती 100 दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास 835 कोटी रुपये इतकी आहे.

3 / 5
2014 मध्ये अभिषेक बच्चनने स्पोर्ट्स ओनरशिपमध्ये पाऊल ठेवलं होतं. प्रो कबड्डी लीगची जयपूर पिंक पँथर्स टीम त्याने खरेदी केली होती. गेल्या काही वर्षांत यातून त्याने बराच नफा कमावला आहे. तो इंडियन सुपर लीगची टॉप टीम चेन्नयिन एफसीचाही सहमालक आहे.

4 / 5
ऐश्वर्या रायसुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लॉरियल पॅरिस या जगविख्यात ब्रँडची ग्लोबल अॅम्बेसेडर आहे. या ब्रँडची ग्लोबल अॅम्बेसेडर बनणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

5 / 5
ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्याकडे कोट्यवधींची रिअल इस्टेट संपत्तीसुद्धा आहे. यामध्ये दुबईतल्या सँक्चुअरी फॉल्समध्ये 16 कोटी रुपयांचा आलिशान व्हिला आणि मुंबईतही काही अपार्टमेंट्सचा समावेश आहे. बच्चन कुटुंबीयांकडे बोरिवलीत सहा आणि मुलुंडमध्येही काही अपार्टमेंट्स आहेत.