IND vs NZ : अभिषेक शर्मा रेकॉर्डचा बाप, न्यूझीलंडला धोपटलचं पण एकाच सामन्यात इतके रेकॉर्ड की थक्क व्हाल
IND vs NZ : टीम इंडियाचं न्यूझीलंड विरुद्ध टी20 सीरीजमध्ये जबरदस्त प्रदर्शन सुरु आहे. आज अभिषेक शर्माने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना जाम धोपटलं. एकाच सामन्यात विक्रमांची रांग लावली.

अभिषेक शर्माने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. वेलिंग्टनमध्ये तिसऱ्या टी 20 सामन्यात त्याने 11 षटकार लगावले. टी20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आतापर्यंत तीनवेळा 10 पेक्षा जास्त सिक्स मारण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. अभिषेक शर्माने ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडला. त्याने दोनवेळा ही कमाल केलेली. एरॉन फिंचने दोनवेळा असं केलय. (फोटो-PTI)
टी20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अभिषेक शर्मा पहिला असा फलंदाज आहे, ज्याने आतापर्यंत तीनवेळा 37 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत शतक ठोकलं आहे. अफगाणिस्तान विरुद्ध 30, न्यूझीलंड विरुद्ध 35 आणि इंग्लंड विरुद्ध 37 चेंडूत शतक झळकवलं आहे. (फोटो-PTI)
अभिषेक शर्माने वैभव सूर्यवंशीसोबत मिळतून 18.55 च्या रनरेटने 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. मोईन अली आणि बेयरस्टोचा रेकॉर्ड मोडला. त्यांनी 2022 साली 18.17 च्या रनरेटने 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली होती. (फोटो-PTI)
अभिषेक शर्माने टी 20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 20 पेक्षा कमी चेंडूत 9 वेळा फिफ्टी प्लस स्कोर केला आहे. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. त्याच्याशिवाय अजून कोणी अशी कमाल केलेली नाही. युवराज, वॉर्नर, मुनरो, फिल एलन यांनी 3-3 वेळा असं केलय. (फोटो-PTI)
अभिषेक शर्माने 216 इनिंगमध्ये 11 वं टी20 शतक झळकावलं. त्याने 10 शतकं ठोकणाऱ्या विराट कोहलीला मागे टाकलं. विराटने 10 टी20 शतकं झळकवण्यासाठी 413 इनिंग घेतल्या होत्या. (फोटो-PTI)