
हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला फार महत्त्व आहे. अनेकांच्या घरासमोरील अंगणात तुळशीचे एक झाड असतेच. पण एका प्रकारच्या तुळशीच्या झाडामुळे तुमचे कुटुंब आर्थिक संकटात सापडू शकते.

घरात नेहमी हरवीगार तुळस लावली पाहिजे, असे म्हणतात. तुळशीचे झाड सुकून गेल्यास ते घरात ठेवू नये, असे म्हटले जाते.

ज्योतिषशास्त्रात तुळशीचे झाड सुकून जाणे हे फार अशूभ मानले जाते. त्यामुळे तुळशीचे झाड सुकले की ते घरातून काढून टाकावे.

तुळशीचे झाड सुकले की तुम्हाला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागू शकते, असे म्हटले जाते.

तसेच घरातील तुळशीचे झाड सुकून गेल्यास लक्ष्मी टिकत नाही, असेही म्हणतात.

त्यामुळे घरातील तुळस सुकून गेली तर तिला एखाद्या नदीत विसर्जित करावे. तसेच शुक्रवारी किंवा गुरुवारी नवे तुळशीचे झाड लावायला हवे. (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)