Chanakya Niti | दोघात ‘तिसरा’ तर ‘घरपण’ विसरा, सुखी संसारासाठी आचार्य चाणक्यांचे प्रेमाचे चार सल्ले

| Updated on: Apr 23, 2022 | 9:22 AM

आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्र या पुस्तकात वैवाहिक (Married life) जीवनासाठी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

1 / 5
आचार्य चाणक्य (Chanakya Niti) हे महान व्यक्तिमत्व होते. चाणक्याच्या धोरणांमुळे नंद वंशाचा नाश झाला आणि त्याच्याच धोरणांच्या जोरावर एक साधा मुलगा चंद्रगुप्त मौर्य मगध राज्याचा सम्राट झाला असे म्हणतात. चाणक्याला (Chanakya) केवळ राजकारणच नव्हे तर समाजाच्या प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान होते. आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्र या पुस्तकात वैवाहिक (Married life) जीवनासाठी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

2 / 5
माणूस एकवेळा विष पचवू शकतो. मात्र, दिलेला धोका कधीही विसरू शकत नाही. फसवणूक हे विषासारखे आहे असे चाणक्याने आपल्या नीतिशास्त्रात नमूद केले आहे. केवळ पती-पत्नीच नाही तर कोणत्याही नात्यात फसवणूक होऊ करू नये. जर तुम्हाला तुमचे नाते घट्ट करायचे असेल, तर आयुष्यात कधीही कोणची फसवणूक करु नका.

3 / 5
चाणक्य नीतीमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, पती-पत्नीच्या नात्यात खोट्या गोष्टीला स्थान नाही. जर पती-पत्नी एकमेंकांना खोटे बोलले आणि ते काही दिवसांनी समजले तर नात्यामध्ये दुरावा येण्यास सुरूवात होते आणि नाते कमकुवत होते. त्यामुळे नात्यामध्ये कधीच खोटे बोलू नका. पती-पत्नीने एकमेकांशी एकनिष्ठ असले पाहिजे.

4 / 5
नात्यामध्ये कोणीही छोटे आणि कोणीही मोठे नसते. चाणक्य नीतीनुसार पती-पत्नीने नेहमी एकमेकांचा सन्मान केला पाहिजे. असे केल्याने नात्यात गोडवा टिकून राहतो.

5 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते, रागामुळे कोणतेही नाते इतके कमकुवत होऊ शकते ते नाते टिकण्याची शक्यता खूपच कमी होते. वैवाहिक जीवनात पती किंवा पत्नीने नेहमी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागते. रागाच्या भरात केलेल्या गोष्टी आपल्याला पश्चातापाशिवाय काहीही देत नाहीत. घरातील गोष्टी तिसऱ्या व्यक्तीला सांगू नका. चारित्र्य जपा. संसारात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली तर कलह झालाच म्हणून समजा. त्यामुळे गोडी गुलाबीने घ्या