Aamir Khan : आमिर खानने हे काय केलं? लग्नात घातले बायकांसारखे चैन? नेमकं सत्य काय?
या विवाहाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. आपल्या लग्नात आमिर खाने परिधान केलेल्या ड्रेसबद्दलही अनेक तर्क लावले जात आहेत. स्वत:च्या लग्नात तो अनवाणी पायांनी फिरत होता.

प्रसिद्ध अभिनेता आमिर खानने तिसऱ्यांदा लग्न केले आहे. गौरी स्प्रॅट या आपल्या गर्लफ्रेंडसोबत त्याने हे लग्न केलं आहे. घरात छोटेखानी समारंभात या दोघांचा विवाह सोहळा पार पडला आहे.

या विवाहाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. आपल्या लग्नात आमिर खाने परिधान केलेल्या ड्रेसबद्दलही अनेक तर्क लावले जात आहेत. स्वत:च्या लग्नात तो अनवाणी पायांनी फिरत होता.

विशेष म्हणजे आमिर खान अनवाणी पायाने फिरत असतानाच त्याच्या पायात एक विशेष दागिना होता. हा दागिना नेमका काय होता, असे ही विचारले जात आहे. दरम्यान, त्याच्या पायात असलेला हा दागिना एका प्रकारचा चैन होता असे म्हटले जात आहे.

अगोदर राजे, महाराजे, धनिक लोक प्रतिष्ठेचा भाग म्हणून वेगवेगळे अलंकार परिधान करायचे. त्याच काळात काही लोक पायात चैनही घालायचे. चैन हा दागिना फक्त महिलांपुरताच मर्यादित नव्हता. तो दागिना एक प्रतिष्ठेचा भाग होता.

याच कारणामुळे आमिर खाननेही पायात चैनाप्रमाणे एखादा दागिना परिधान केला असावा, असा कयास लावला जात आहे. पायात चैन असलेले अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.