
अभिनेता अरबाज खान याने पत्नी शूरासोबत एक रोमॅंटीक फोटोशूट केलं आहे.

मलायका अरोरापासून घटस्फोट घेतल्यानंतर ७ वर्षांनी अरबाज खानने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हेअर आर्टिस्ट शूरा खानशी लग्न केले. आता अरबाज आणि शूराच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आहे

शूरा आणि अरबाज दोघांनीही त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसापूर्वी हे सुंदर फोटोशूट केले आहे, या फोटोंचे चाहतेही कौतुक करताना दिसत आहेत.

फोटोंमध्ये शूरा खानने साडी नेसली असून अरबाजने कुर्ता-पायजमा घातला आहे. लोकांना यांची पारंपरिक शैली खूपच आवडली आहे.

हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना दोघांनी ‘जस्ट बीइंग यू’ असे कॅप्शन दिले आहे.

या फोटोंवर दोघांच्याही चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. एकाने लिहीलं आहे की “अरबाजला शूरासारखी मुलगी मिळाली हे त्याच भाग्य आहे, ती खूप डाउन टू अर्थ आहे”, तर दुसऱ्या एका युजर्सने म्हटलं आहे की “खान कुटुंबाला साजेल अशी सून आहे", तर आणखी काही जणांनी लिहिले “देवाने सुंदर जोडा बनवला आहे.”

दरम्यान, शूरा अरबाजपेक्षा तब्बल 23 वर्षांनी लहान आहे. तसेच शूराची अरबाजशिवाय मलायका आणि अरबाजचा मुलगा अरहानसोबतही चांगली बॉन्डिंग आहे.