AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Booking: 21, 25 की 45 दिवस; एलपीजी सिलेंडरची बुकिंग कधी करता येईल?

LPG Cylinder Booking Waiting Period: बाजारात सध्या गॅस तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे प्रत्येकाला गॅस मिळण्यासाठी सरकारने गॅस सिलेंडर बुकिंगविषयी मोठा बदल केला आहे. त्याचा थेट परिणाम कोट्यवधी ग्राहकांवर झाला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने गॅस सिलेंडर बुकिंगचे नियम बदलले आहेत.

LPG Booking: 21, 25 की 45 दिवस; एलपीजी सिलेंडरची बुकिंग कधी करता येईल?
LPG Cylinder Booking waiting periodImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 13, 2026 | 2:34 PM
Share

LPG Cylinder Booking Waiting Period: जगभरात ऊर्जा संकट ओढावले आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅसचा पुरवठा संतुलित आणि नियमित ठेवण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. आता ग्राहक त्यांच्या मनाप्रमाणे केव्हा पण सिलेंडर बुक करू शकणार नाहीत. गॅस वितरण कंपन्यांनी (IOCL, BPCL, HPCL) रिफलिंगसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. अफवा आणि पॅनिक बुकिंग थांबवण्यासाठी सरकारने नियमावली आणली आहे. त्यानुसार बुकिंगचा कालावधी वाढला आहे.

काय आहे नियम?

नवीन नियमानुसार, आता दोन सिलेंडरच्या दरम्यान एक निर्धारीत कालावधी असेल. यापूर्वी ग्राहकांना महिनाभरात सहज गॅस सिलेंडर बुक करता येत होते. आता सामान्य नागरिकांसाठी ही कालमर्यादा 15 ते 21 दिवस इतकी निश्चित करण्यात आली आहे. एकदा सिलेंडर मिळाल्यावर पुढील 15 ते 21 दिवसांपर्यंत दुसरे सिलेंडर बुक करता येणार नाही. वितरण विस्कळीत झाले असले तरी कमीत कमी एक सिलेंडर ग्राहकांना मिळावे असा सरकारचा प्रयत्न आहे.

बुकिंग करता येणार नाही

जिथे पुरवठा अधिक आहे, तिथे ही मर्यादा 25 ते 45 दिवसांपर्यंत आहे. यामुळे एकाचवेळी एकच माणूस अधिक सिलेंडर बुक करून घरी घेऊन जाऊ शकत नाही. तर गरजवंतांना गॅस टंचाईचा सामना करावा लागणार नाही, त्यासाठी हा नियम करण्यात आला आहे. जर तुम्ही या कालावधीत पुन्हा सिलेंडर बुकिंग करण्याचा प्रयत्न केला तर ती विनंती नामंजूर होते अथवा त्यावर काहीच उत्तर मिळत नाही.

या लोकांना 45 दिवसात सिलेंडर

ग्रामीण भागात (Rural Areas) जिथे पुरवठा होण्यास वेळ लागतो. तिथे बुकिंगचा कालावधी 45 दिवस इतकी ठेवण्यात आली आहे. तर शहरी भागात जिथे गॅस एजन्सी अगदी जवळ असते, तिथे हा कालावधी 21 दिवसांचा ठेवण्यात आला आहे. ज्या कुटुंबाकडे ‘सिंगल सिलेंडर’ कनेक्शन आहे. त्यांना ‘डबल सिलेंडर’ (DBC) असणाऱ्यांपेक्षा बुकिंगमध्ये प्राधान्य देण्याकडे कल आहे. त्यामुळे तुम्ही गॅस सिलेंडर बुकिंग करून किती दिवस झाले हे अगोदर तापासा. सरकार करत असलेल्या प्रयत्नामुळे लवकरच सिलेंडर तुटवड्याची समस्या सुटणार आहे.

Follow Us
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली