
बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा लेक ‘स्टारडम’ या वेब सीरिजच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करतोय. डायरेक्टर म्हणून तो बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

विशेष म्हणजे आर्यन खान याच्या या वेब सीरिजमध्ये अनेक मोठी नावे केमिओ करताना दिसणार आहेत. स्वत: शाहरुख खानचा या वेब सीरिजमध्ये केमिओ आहे.

आर्यन खानच्या वेब सीरिजमध्ये अभिनेते मनोज पाहवा देखील महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत. नुकताच आता आर्यनबद्दल मनोज पाहवाने मोठा खुलासा केला.

मनोज पाहवा म्हणाले की, मी वेब सीरिजबद्दल जास्त माहिती देऊ शकत नाही. पण आर्यन खान याच्या बऱ्याच सवयी या शाहरुख खान याच्यासारख्याच आहेत.

वेळी आली तर शाहरुख खान हा देखील 18 ते 20 तास काम करतो. शाहरुखप्रमाणेच आर्यन खान हा देखील 18 ते 20 तास काम करतो. आता मनोज यांच्या या विधानाची चर्चा होत आहे.