आरध्यासारखं वागणं बंद कर… सगळ्यांसमोर अमिताभ बच्चन ऐश्वर्याला असं काही म्हणाले की… व्हिडीओ तुफान व्हायरल
हिंदी सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांची सुन ऐश्वर्या राय बच्चन यांचा एक जुना व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये दोघांमधील प्रेमळ तसेच मिश्किल संवाद पाहायला मिळतो. ऐश्वर्याने अमिताभ यांचं कौतुक केल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने नेटकऱ्यांचे लक्ष वेधलं आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत

अमिताभ बच्चन यांचा 11 ऑक्टोबरला वाढदिवस होता. त्यांचा वाढदिवस चाहत्यांनी तसेच कुटुंबियांनी आनंदात साजरा केला. यादरम्यान ऐश्वर्या रायसोबतचा त्यांचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
या व्हिडीओमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय अमिताभ यांना प्रेमाने मिठी मारताना दिसते. यावेळी ती त्यांचं कौतुक करत त्यांना सर्वोत्तम असल्याचं सांगते.
ऐश्वर्याचं कौतुक ऐकल्यानंतर अमिताभ तिला मिश्किलपणे म्हणतात, 'आराध्या सारखं वागणं बंद कर'. त्यांच्या या प्रतिक्रियेने उपस्थितांचं लक्ष वेधलं.
अमिताभ यांच्या बोलण्यावर ऐश्वर्या राय म्हणते, “ते सगळ्यांना माहिती आहे मी तुमची अराध्या आहे”. या संवादातून दोघांमधील जिव्हाळ्याचं नातं दिसून येतं.
हा व्हिडीओ पाहून अनेकांनी दोघांच्या नात्याचं कौतुक केलं आहे. काहींनी हा क्षण गोड आणि हळवा असल्याचं म्हटलं, तर काही नेटकऱ्यांनी व्हिडीओवर टीकाही केली.