
बालिका वधू फेम अविका गौरच्या संपूर्ण कुटूंबाला कोरोनानं ग्रासलंय. नुकतंच तिनं आपल्या सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना याविषयी माहिती देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी सर्वांनी पुढे येऊन एकमेकांना पाठिंबा देणं फार महत्वाचं आहे, असं अविकानं लिहिलंय. कारण तिच्या कुटुंबीयांनीही कोरोनाशी संघर्ष केला आहे आणि ती ही लढाई जिंकली आहे.

बालिका वधू फेम अभिनेत्री अविका गौर पुढं लिहिते की माझ्या कुटुंबानं या लढाईचा सामना केला आहे आणि मी ही वेळ कधीच विसरू शकत नाही. हा खूप भितीदायक काळ होता. ते यातून बाहेर पडले याचा मला आनंद आहे पण कुणीही त्यातून जाऊ नये अशी माझी इच्छा आहे.

अविकानं प्रत्येकाला विनंती केली आहे की कोरोनाच्या या लढाईत आपल्याला जिंकायचं आहे त्यामुळे तुम्हाला पुढे येऊन प्लाझमा डोनेशन करावं लागणार आहे.

कृपया प्लाझ्मा दान करा. यात आपल्या शरीरातून फारसं काही जात नाही आणि रुग्णालये देखील प्लाझ्मा घेण्यात खूप काळजी घेत आहेत. तुमची पाळी जेव्हा येईल तेव्हा लस नक्की घ्या. लस कोरोनाच्या परिणामांपासून आपलं संरक्षण करेल.

हे फोटो शेअर करत तिनं कोरोनाबद्दल ही माहिती दिली आहे.