
अभिनेत्री दलजीत कौर ही कायमच चर्चेत असते. दलजीत कौरचे दुसरे लग्न देखील तुटले आहे. आता याबद्दलच बोलताना दलजीत कौर ही दिसली आहे.

दलजीत कौरने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. यावेळी चाहते हे मोठ्या प्रमाणात यावर कमेंट करताना दिसले. चाहत्याच्या कमेंटवर उत्तर देताना दलजीत कौरने मोठे भाष्य केले.

दलजीत कौर म्हणाली की, मी माझे सर्वकाही तिथे सोडून आलीये. मला खूप जास्त विश्वास होता, कारण तो स्वत: दोन मुलींचा बाप आहे. तो मुलींना सांभाळत आहे, त्यामुळे तो धोका देणार नाही.

माझ्यासोबत काय वाईट करणार. पण मी खूप चुकीची होती. मला वाटले नव्हते की, इतका मोठा धोका माझ्यासोबत होईल. तेही लग्नाच्या दहा महिन्यांनंतर.

आता अभिनेत्रीच्या कमेंटची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. दलजीत कौर हिचे निखिल पटेल याच्यासोबतचे हे दुसरे लग्न आहे. शालिन भनोट याच्यासोबत दलजीत कौरचे पहिले लग्न झाले होते.