20 वर्षांपासून या अभिनेत्रीने सेटवर आरसाच पाहिला नाही, दिसते इतकी सुंदर की.., कोण आहे ती?

गेल्या 20 वर्षांपासून ही अभिनेत्री शेटवर कधीच बघत नाही स्वत:चा चेहरा, दिसते इतकी सुंदर की सौंदर्यात बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना देते टक्कर. कोण आहे ती अभिनेत्री?

| Updated on: Aug 22, 2026 | 4:44 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जाते. ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने विविध भूमिका साकारल्या. मात्र, अभिनयासोबतच तिच्या साधेपणाची आणि नैसर्गिक सौंदर्याचीही नेहमीच चर्चा होते.

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जाते. ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने विविध भूमिका साकारल्या. मात्र, अभिनयासोबतच तिच्या साधेपणाची आणि नैसर्गिक सौंदर्याचीही नेहमीच चर्चा होते.

2 / 5

सध्या दिया ‘ऑपरेशन सफेद सागर’मुळे चर्चेत आहे. अशातच दियाने तिच्या कामाशी संबंधित एक खास खुलासा केला आहे. गेल्या तब्बल 20 वर्षांपासून शूटिंगच्या सेटवर आपण आरशात स्वतःला पाहत नसल्याचे तिने सांगितले. एवढेच नाही तर शॉट दिल्यानंतर मॉनिटरवर आपला परफॉर्मन्स पाहण्याची सवयही तिला नाही.

3 / 5

टाइम्स नाउला दिलेल्या मुलाखतीत दियाने सांगितले की, शूटिंगदरम्यान ती मुद्दाम आरशापासून दूर राहते. आपला लूक कॅमेऱ्यात कसा दिसतोय, यापेक्षा त्या भूमिकेवर आणि अभिनयावर लक्ष केंद्रित करणं तिला अधिक महत्त्वाचं वाटतं.

4 / 5

अनेक कलाकार शॉट दिल्यानंतर मॉनिटरवर आपला अभिनय, हावभाव आणि लूक तपासतात. मात्र, दिया या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवते. लूक्सवर सतत लक्ष केंद्रित केल्याने मनःशांतीवर परिणाम होऊ शकतो, हे तिला करिअरच्या सुरुवातीलाच जाणवल्याचे तिने सांगितले.

5 / 5

दियाच्या या विचारसरणीची सध्या सोशल मीडियावरही चर्चा होत आहे. ग्लॅमरच्या दुनियेत राहूनही स्वतःच्या लूकपेक्षा अभिनयाला प्राधान्य देण्याचा तिचा दृष्टिकोन अनेकांना भावला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us