
अभिनेत्री दिया मिर्झा, व्यावसायिक वैभव रेखीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या तिच्या लग्नाची तयारी सुरु आहे.

15 फेब्रुवारीला दिया मिर्झा आणि वैभव रेखी लग्नबंधनात अडकणार आहेत.

याच दरम्यान दिया आणि वैभव यांनी आपल्या मित्र परिवारासमवेत आणि कुटुंबासमवेत एक छानसं गेट-टू-गेदर केलं.

यात वैभवच्या कुटुंबाने दियाचे जोरदार स्वागत केले आहे. पूजा दादलानीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोत दिया मिर्झाने सुंदर पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांसोबत हा विवाह सोहळा मुंबईमध्ये पार पडणार आहे. वैभव रेखी हा वांद्रे येथील पाली हिल भागात राहतो.