Kareena Kapoor : लोलो रात्र रात्र रडायची, ती कडवट आठवण सांगताना करीना भावूक; कपूर घराण्यात असं काय घडलं?

बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सना सहज संधी मिळते, अशी चर्चा नेहमीच होत असते. मात्र प्रत्येक स्टारकिडचा प्रवास सोपा नसतो. कपूर कुटुंबातील अभिनेत्री करिश्मा कपूरलाही चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. तिच्या या संघर्षाबद्दल बहिण करीना कपूर खानने एका कार्यक्रमात खुलासा केला. बहिणीचं स्ट्रगल आठवून करीना भावूक झाली.

| Updated on: Jul 24, 2026 | 1:09 PM
1 / 7
 हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री असलेली करिश्माचे अनेतक चाहते आहेत. पण तिच्या स्ट्रगलबद्दल फार कमी जणांना माहीत असेल.   करिश्माने वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. तिची आई बबिता कपूर यांनी तिला या प्रवासात खंबीर साथ दिली. मात्र सुरुवातीच्या काळात कुटुंबातील सर्वांकडून अपेक्षित पाठिंबा काही करिश्माला मिळाला नाही. ( All Photos : Social Media)

हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री असलेली करिश्माचे अनेतक चाहते आहेत. पण तिच्या स्ट्रगलबद्दल फार कमी जणांना माहीत असेल. करिश्माने वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. तिची आई बबिता कपूर यांनी तिला या प्रवासात खंबीर साथ दिली. मात्र सुरुवातीच्या काळात कुटुंबातील सर्वांकडून अपेक्षित पाठिंबा काही करिश्माला मिळाला नाही. ( All Photos : Social Media)

2 / 7

याबद्दल करिश्माची धाकटी बहीण आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरने ‘डान्स इंडिया डान्स’ या कार्यक्रमात खुलासा केला. करिश्माने चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बबिता यांनी सपोर्ट केला. पण त्यांचे वडील आणि अभिनेते, रणधीर कपूर यांच्याकडून फार पाठिंबा मिळाल नाही, असं करीनाने सांगितलं. करिश्माच्य पदार्पणाचा निर्णय झाल्यावर बबिता यांनी काही सलला घेण्यासाठी रणधीर यांना कॉल केला हता.

3 / 7

ती म्हणाली सुरूवातीला डॅडींनी (रणधीर कपूर) त्यांना सपोर्ट केला, पण नंतर लवकरच ते मागे हटले. त्या दरम्यान करिश्माने मुंबईभर अनेक स्क्रीन टेस्ट दिल्या आणि अनेकदा तिला नकारांचा सामना करावा लागला. “अनेक लोकांनी तिच्यासोबत काम करण्यास नकार दिला. एका टप्प्यावर बाबांनीही तिचा पाठिंबा सोडला होता,” असं करीनाने सांगितलं.

4 / 7

सिमी गरेवाल यांच्या चॅट शोमध्येही करीनाने करिश्माच्या संघर्षाचा उल्लेख केला होता. “राज कपूर यांचे नाव असूनही करिश्माला इंडस्ट्रीकडून सहज मदत मिळाली नाही. आईने खूप संघर्ष केला. लोलो (करिश्मा) अनेक रात्री रडायची, जागी असायची आणि मी हे सर्व पडद्यामागून पाहायचं,” असं करीनाने सांगितलं होतं.

5 / 7

मी आई आणि बहिणीच्या आयुष्यातील अनेक कठीण प्रसंग जवळून पाहिले आहेत. लोकांनी त्यांना कमी लेखले, पण बबिता यांनी हार मानली नाही, असंही करीनाने नमूद केलं होतं.

6 / 7

अखेर 1991 मध्ये करिश्मा कपूरने ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी ती केवळ 16 वर्षांची होती. त्यानंतर अथक मेहनत केली आणि मागे वळून पाहिलं नाही. 90च्या दशकात अनेक हिट चित्रपट देत करिश्माने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आणि बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक बनली.

7 / 7

तर 2000 साली आलेल्या 'रिफ्यूजी' मधून करीनाने बॉलिवूड डेब्यू केला आणि ती इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक बनली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us