
नुकतचं संपूर्ण देशात महिला क्रिकेट टीमच्या वर्ल्ड कप विजयाचं जोरदार सेलिब्रेशन झालं. लोकांनी सोशल मीडियावर टीमच कौतुक करताना हा देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं म्हटलं.

पण एकवेळ अशी सुद्धा होती, जेव्हा महिला क्रिकेट टीमकडे आंतरराष्ट्रीय टुर्नामेंटमध्ये सहभागी होण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळी मंदिरा बेदीने टीमची मदत केलेली.

मंदिरा बेदी कमालीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने सिनेमा, टीव्ही क्षेत्रात बरच काम केलं आहे. सोबतच ती क्रिकेट सपोर्टर म्हणून सुद्धा ओळखली जाते.

सुनील गावस्कर यांची बहिण नूतनने एका इंटरव्यूमध्ये सांगितलं की, महिला टीम कठीण प्रसंगातून जात होती, त्यावेळी मंदिरा बेदीने आर्थिक मदत केलेली.

नूतन म्हणाल्या की, महिला टीमला इंग्लंड दौऱ्यावर जायचं होतं. त्यांच्याकडे कोणी स्पॉन्सर नव्हता. त्यावेळी मंदिरा बेदीने तिचे सर्व पैसे आम्हाला दिलेले.

आमच्याजवळ पैसे नव्हते, मंदिरा बेदीने एका प्रसिद्ध हिऱ्याच्या ब्रांडसाठी जाहीरात शूट केलेली. मंदिराने जाहीरातीचा सर्व पैसा WCAI ला दान केला, असं नूतन म्हणाल्या.

मंदिर बेदीने दिलेल्या या पैशामुळे भारतीय वुमेन्स टीमला इंग्लंड दौऱ्यासाठी हवाई तिकीटाची व्यवस्था करण्यात भरपूर मदत झाली होती, असं नूतन म्हणाल्या.