
मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्री मीनाक्षी राठोड व अभिनेता कैलास वाघमारे नुकतेच आई-बाबा झालेत.त्यांच्या घरी काही काही दिवसांपूर्वी मुलीचे आगमन झाले आहे. दोघांनीही नुकतेच त्यांच्या चिमुकलीच्या बारश्याच्या सोहळा साजरा केला आहे.

मीनाक्षी व कैलास यांनी आपलया कुटुंबाच्या यासोबत हा सोहळा साजरा केला जाणार आहे. त्यांनी आपल्या मुलीचे नाव यारा ठेवले आहे.


My Name is “YARA” असे कॅप्शन देत मीनाक्षीने हे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोना चाहत्यांकडूनही भरभरून प्रेम मिळत आहे.

बारश्याच्या कार्यकर्मापूर्वीही मीनाक्षीने या कार्यक्रमाच्याएका छोटा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. मीनाक्षी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून घराघरात पोहचली आहे.

या मालिकेतील मीनाक्षी साकारत असलेलं देवकी हे पात्र प्रेक्षकांच्याही चांगलेच पसंतीस उतरलेले आहे.,