
मराठी मालिका ‘देवमाणूस’ सध्या प्रेक्षकांच्या पसंतीची ठरतेय. या मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय.

आता देवमाणूस या मालिकेत एक महत्त्वाचा बदल होणार आहे.

मालिकेतील गाजत असलेलं पात्र म्हणजेच मंजुळा आता मालिकेतून एक्झिट घेत आहे.

मालिकेत डॉक्टर आणि मंजुळाची केमेस्ट्रि चांगलीच गाजली आहे. त्यामुळे हा बदल आता प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

मंजुळाच्या एक्झिटनंतर मालिकेत पुढे काय घडणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर आता लवकरच या मालिकेत आणखी एका सावजाची एन्ट्री होत आहे.

मालिकेत ज्या कलाकाराची एन्ट्री होत आहे त्या अभिनेत्रीचे नाव आहे नेहा खान.

नेहा खान ही अभिनेत्री तसेच मॉडेल म्हणून हिंदी, मराठी सृष्टीत ओळखली जाते. ती मूळची अमरावतीची आहे. आठव्या वर्गात शिकत असताना तिनं मॉडेलिंग कॉम्पिटीशनमध्ये सहभाग घेतला होता.
